Home Breaking News Bhadravti taluka news • रोप स्किपिंग क्रीडा प्रकार हा नियमित फिटनेससाठी आवश्यक...

Bhadravti taluka news • रोप स्किपिंग क्रीडा प्रकार हा नियमित फिटनेससाठी आवश्यक उपाय:प्रा.अजय पाटील

110

Bhadravti taluka news
• रोप स्किपिंग क्रीडा प्रकार हा नियमित फिटनेससाठी आवश्यक उपाय:प्रा.अजय पाटील

सुवर्ण भारत ✍️राजेश येसेकर
तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती:जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपुर व
चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर रोप स्कीपपिंग असोसिएशन
च्या संयुक्त विद्यमानाने तसेच पाटील कोचिंग अकादमी, भद्रावतीच्या पुढाकाराने आयोजित भव्य जिल्हास्तरीय रोप स्कीपपिंग प्रशिक्षण शिबीर आज रविवार दिनांक ०८ सप्टेंबर २०२४ ला तालुका क्रीडा संकुल,भद्रावती,चंद्रपुर येथे संपन्न झाले.

सर्व वयोगटातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व वयोवृध्द यांना सुद्धा आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोप स्किपींग ( दोरी वरच्या उड्या मारणे) हा सर्वांच्या बालपणातील घरगुती खेळ सराव नियमित पणे करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन शिबिर उद्घघाटनप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.अजय पाटील (डायरेक्टर – पाटील कोचिंग अकॅडमी, भद्रावती) यांनी केले.

मंचावर प्रमुख तांत्रीक मार्गदर्शक मास्टर दुर्गराज रामटेके (नॅशनल रेफेरी व जज – इंडियन रोप स्कीप्पिग फेडरेशन) तर प्रमुख अतिथी रूपाने जिल्हा रोप स्किप्पिग असोसिएशनचे सल्लागार श्री रामकृष्ण राऊत सर(चंद्रपूर),मास्टर बी.एल. करमणकर सर(जिल्हा कोच – रोप स्किप्पिग, राजुरा),राकेश राय सर( क्रीडा शिक्षक – कारमेल अकादमी, दाताळा रोड), सुरेंद्रसिंग चंदेल सर(क्रीडा शिक्षक – वियाणी पब्लिक स्कूल, चंद्रपूर), साहिल चाहरे सर (बीजेएम कारमेल अकादमी, चंद्रपूर),नितीन भैसारे सर(महाराष्ट्र पोलीस),निलेश भैसारे सर, उल्फतदिन सय्यद सर(अध्यक्ष – आयुध निर्मानि कामगार सेना,आयुध निरमानी चांदा), नॅशनल गोल्ड मेडलिस्ट गौरव पघेन सर,कोरपना तालुका कोच – मास्टर संदीप पंधरे सर,प्रा.कपिल राऊत सर, सचिन इरुटकर सर, कृष्णा रामटेके सर इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

या प्रशिक्षण शिबिरात जिल्हयातील राजुरा, कोरपना, बल्लारशाह, चंद्रपूर, भद्रावती, चीमुर, वरोरा तालुक्यातील 94 शालेय विद्यार्थ्यांनी व 13 कोचस नी सहभाग नोदविला.

या कॅम्पच्यां यशस्वी आयोजनासाठी चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर रोप स्कीपपिंग असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य शितल रामटेके,करण डोंगरे, सॅम मानकर,क्रिश भोस्कर,संजय माटे,आकाश वाघामारे, सुरज मेश्राम,किशोर झाडे,आनंद डांगे,किशोर ढवळे,यश सोरते,गौतम भगत यांनी कठीण प्रयास केलेला आहे.