Home Breaking News Bhadravti taluka news • शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे भक्तिरसात तल्लीन...

Bhadravti taluka news • शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे भक्तिरसात तल्लीन • ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ च्या भजनाने भक्तिमय केले वातावरण

76

Bhadravti taluka news

• शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे भक्तिरसात तल्लीन

• ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ च्या भजनाने भक्तिमय केले वातावरण

सुवर्ण भारत ✍️राजेश येसेकर
भद्रावती तालुका प्रतिनिधी

भद्रावती : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या घरी विशेष भजन कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात त्यांनी ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ हे प्रसिद्ध गणपती भजन गात भक्तिरसात तल्लीन होत, घरातील वातावरण पूर्णतः भक्तिमय केले.

मुकेश जिवतोडे हे सामाजिक आणि राजकीय कार्यात सदैव आघाडीवर राहिले आहेत. मात्र, आपल्या कुटुंबीयांसोबत धार्मिक कार्यक्रमांमध्येही ते तितक्याच निष्ठेने सहभाग घेतात. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर त्यांनी आपल्या कुटुंबासोबत पूजा-अर्चा आणि आरती केली होती. त्यानंतर या विशेष भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या भजन कार्यक्रमात ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ या गाण्याचे सादरीकरण करताना वडिलांची साथ मिळाल्याने मुकेशभाऊ अधिकच आनंदित झाले. वडिलांसोबतचा हा भावनिक क्षण उपस्थितांसाठीही भावपूर्ण ठरला. घरातील सदस्य आणि इतर काही निमंत्रितांनीही या भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतला.

मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत, मात्र अशा धार्मिक कार्यक्रमांमधून त्यांची श्रद्धा आणि कुटुंबाशी असलेले प्रेम यांचे दर्शन घडते.