Home Breaking News • भद्रावती तालुक्यात एकाच दिवशी दोन गळफास घेऊन वेगवेगळ्या आत्महत्या •...

• भद्रावती तालुक्यात एकाच दिवशी दोन गळफास घेऊन वेगवेगळ्या आत्महत्या • मांगली येथील २२वर्षिय युवक व सुमठाणा येथील ४२वर्षिय महिला यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

115

• भद्रावती तालुक्यात एकाच दिवशी दोन गळफास घेऊन वेगवेगळ्या आत्महत्या

• मांगली येथील २२वर्षिय युवक व सुमठाणा येथील ४२वर्षिय महिला यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुवर्ण भारत ✍️राजेश येसेकर भद्रावती

(तालुका प्रतिनिधी) भद्रावती : येथील दोन किमी अंतरावर असलेल्या सुमठाणा येथील एका ४२ वर्षे महिलेने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक ७ रोज शनिवारला शहरातील जुना सुमठाणा येथे घडली. आम्रपाली संजय ब्राह्मणे, वय ४२ वर्षे,राहणार सुमठाना, भद्रावती असे या मृतक महिलेचे नाव आहे. सदर महिलेच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही.
घरातील सर्व लोक खाली असताना वरच्या मजल्यावरील खोलीत गळफास घेऊन सदर महिलेने आत्महत्या केली. घरच्या लोकांच्या लक्षात सदर घटना आल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला. त्यानंतर भद्रावती पोलीसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

दुसरी घटना भद्रावती तालुक्यातील मांगली येथील एका युवकाने गावालगत असलेल्या आपल्या शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मांगली येथे दिनांक ७ रोज शनिवारला घडली.
ऋतिक विजू चौधरी, वय २२ वर्षे, राहणार मांगली. असे मृतक युवकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी येऊन आवश्यकती कार्यवाही केली व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पाठविला.वरील घटने प्रमाणेच यांच्याही मृत्यूचे कारण अद्यापकळू शकले नाही.या दोन्ही घटनेचा तपास भद्रावती पोलीस करीत आहे.