Home Breaking News Chandrapur City News • मराठा सेवा संघ प्रणित वसतिगृहातील भोजन कक्षाचे...

Chandrapur City News • मराठा सेवा संघ प्रणित वसतिगृहातील भोजन कक्षाचे उद्घाटन थाटात संपन्न! •विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून हे भोजन कक्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार!

79

Chandrapur City News

• मराठा सेवा संघ प्रणित वसतिगृहातील भोजन कक्षाचे उद्घाटन थाटात संपन्न!
•विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून हे भोजन कक्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार!

सुवर्ण भारत: किरण घाटे (उपसंपादक)

चंद्रपूर : मराठा सेवा संघ प्रणित कर्मवीर भाऊराव पाटील मुलांचे वसतिगृह, तुकूम, चंद्रपूरच्या भोजन कक्षाचे उद्घाटन आज दि.06 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता थाटात पार पडले. यावेळी इंजि. दिपक खामनकर, सूर्यकांत खनके, दिपक जेऊरकर, अशोक सोनटक्के,दिलीप होरे, अनंता आत्राम,उषाताई धांडे, आदिं मान्यवर उपस्थित होते.

मराठा सेवा संघाचा वसतिगृह सुरु करण्याचा उद्देश असा आहे की, गांव खेड्यातील मुलं शहरांत येऊन आपलं शिक्षण, नोकरी तसेंच कोणता ना कोणता उद्योग करून स्वतः ची प्रगती करावी.यासोबतच मराठा सेवा संघाचे विचार गांव खेड्यांपर्यंत पोहचवावे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने हे वसतिगृह असून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दिलेल्या मुलमंत्रावर विद्यार्थ्यांना शैक्षणिक, उद्योग, आरोग्यविषय मार्गदर्शन तसेंच कामं करून शिक्षण कसे घेता येईल यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे कामं हे मराठा सेवा संघ करीत राहील.
या वसतिगृहात आजच्या घडीला 25 विद्यार्थी राहत आहे. यापूर्वी वसतिगृहातील 15-20 मुलं नोकरीं व व्यवसायात लागले .वाचनालयात अभ्यास करणारी जवळपास 200 मुलं-मुली शासकीय नोकरीला लागून स्वतः ची प्रगती केली. हे विद्यार्थी आता आपलं सामाजिक ऋण फेडण्याच्या उद्देशाने वसतिगृहाला मदत करतात. या वसतिगृहाकरिता स्वतःची भोजन व्यवस्था अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कारण मुलांना अभ्यास करण्याकरिता त्यांचा वेळ आणि पैसा कसा वाचविता येईल हाच उद्देश ठेवून आज भोजन कक्षाचे उदघाट्न मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे. अनेक दात्यांनी आपा-आपल्या पद्धतीने जसे की तांदूळ, गहू, डाळ, भाजीपाला अशाप्रकारे जे पाहिजे ते कडधान्ये देण्याचे आवाहन केले. तसेच प्रत्येक महिन्यात ज्यांचा कोणाचा वाढदिवस असेल त्यानिमित्ताने वसतिगृहात आपला वाढदिवस साजरा करून त्या दिवशी विद्यार्थ्यांच्या भोजणाची व्यवस्था करण्याचे आवाहन करण्यात आले जेणेकरून विद्यार्थ्यांना किराणा सामान घेण्यात जास्त खर्च होऊ नये या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक जेऊरकर यांनी केले. संचालन विनोद थेरे यांनी केले. तर उपस्थितीतांचे आभार प्रशांत गोखरे यांनी मानले. कार्यक्रमाला मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व वसतिगृहाची विद्यार्थी उपस्थित होते.