Chandrapur Dist News
• चिचपली रेती माफियावर कारवाई कधी होणार?
• चंद्रपूर पोलीस अधीक्षक यांनी दखल घेण्याची जनतेची मागणी
सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात रेती-माफीयाचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. अनेक रेती माफीया तर आता पैशासोबत गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घेऊन समाजात अराजकता माजवित आहे, अशा गुंड प्रवृत्तीच्या रेती माफीयांवर त्वरित कारवाई करण्यात यावी व त्यांना मोक्का अंतर्गत तडीपार करण्यात यावे अशी मागणी आता नागरिकांमध्ये होऊ लागली आहे.
चंद्रपूर शहरातील मुल तालुक्यातील चिचपल्ली परिसरातील असाच एक कुख्यात रेती माफिया मागील काही दिवसांपासून रेती तस्करी मध्ये आपला धाक जमवून व राजकीय पक्षाचे वरदहस्त प्राप्त करून गुंडागर्दी करीत आहे, या रेती तस्करावर यापूर्वी अनेकदा कारवाई झाली असून मधल्या काळात यांचे वर थोड्या फार प्रमाणात लगाम बसला होता. परंतु काही दिवसापासून एका राजकीय नेत्याच्या आशीर्वादामुळे रेती व्यवसायात याने आपले पाय घट्ट रोवले असून त्याचेवर “राजकीय” नेत्याचा असलेला आशीर्वाद आता नागरिकांपासून लपलेला राहिलेला नाही तरी या रेती तस्करावर कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षकांनी मोक्का अंतर्गत कारवाई करून याला तडीपार करण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिक करीत आहे.