• संधीचे सोने करणारे लोकप्रतिनिधी !
• सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार !
सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)
Chandrapur:संधी सगळ्याच्याच आयुष्यात येत असते, त्याचा ‘लाभ’ घेऊन यशस्वी होणारे फार कमी बघण्यास मिळतात. वेगळे काही करायचे नाही, जे करीत आहे त्यात वेगळेपण असणाऱ्यांना इतिहास ओळखतो. आलेल्या ‘संधी’चे ‘सोने’ करणाऱ्यांनी वेगवेगळया क्षेत्रात आपल्या वेगळ्या कार्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आपल्या वेगळ्या कार्याने राजकारणात आपली ओळख निर्माण सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार हे त्यातीलचं एक व्यक्तीमत्व आहे. पहिल्यांदा त्यांनी भाजपकडून चंद्रपूर लोकसभेची निवडणुक लढविली, त्यात बलाढ्य असलेल्या काँग्रेस उमेदवारांकडून त्यांना पराभव पत्करावा लागला, त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी बघता त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते तत्कालिन पंतप्रधान श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘कौन है यह सुधीर ? यह लडका भविष्य में जरूर बडा होंगा.’ या गौरवशाली शब्दात त्यांची पाठ थोपटली, तेच प्रेरणा देणारे वाक्य आज त्यांना लढण्याची व नविन काही करण्याची प्रेरणा देत असेल. त्यानंतर चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातुन त्यांनी निवडणुक लढविली व चंद्रपूरचे भाजपचे पहिले प्रतिनिधी म्हणुन त्यांनी विधानसभेत पाय ठेवला. आज महाराष्ट्राच्या राजकारणातील आश्वासक चेहरा म्हणुन त्यांचेकडे बघितले जाते. सन २०१५ देशात माहिती अधिकार कायदा लागु झाला, त्याला महाराष्ट्र राज्याने ही लागु केले. लोकप्रनिधींसाठी या कायद्याचे बंधन नव्हते. परंतु आपल्याला जनतेने निवडणुक दिले आहे, त्यांचे प्रतिनिधीत्व आपण करीत असल्यामुळे आपल्या कार्याची माहिती जनसामान्यांना मिळावी यासाठी सुधीर आमदार असतांना त्यांनी माहिती अधिकारात आपल्यासंदर्भात माहिती अधिकारामध्ये कोणतीही मिळवून देण्याचा आगळावेगळा प्रयोग आपल्या कार्यालयात सुरू केला. स्वतःसाठी माहिती अधिकार कायदा लावुन घेणारे देशातील ते एकमेव पारदर्शी राजकारणी होय. त्यांची अभ्यासु वृत्ती, आगळे- वेगळेपण, पादर्शकता बघता राज्याच्या सरकारमध्ये त्यांना वित्तमंत्री पद देवू केले, ‘वित्त सोबत नियोजन ही द्या.’, असा आग्रह त्यांनी धरला, वरिष्ठांनी त्यांना राज्याचे वित्त-नियोजन मंत्री बनविले. मुनगंटीवार सुधीर वित्तमंत्री असतांना राज्याच्या वित्तमंत्रालयाला देशात पुरस्कृत करण्यात आले. संधीचे सोने करण्यात ते निपुन आहेत. नंतरच्या काळात अनेक स्थित्यंतरे आली, वरिष्ठ राजकीय नेत्यांमध्ये बेबनाव झाले परंतु मुनगंटीवार यांनी स्वतःला त्यापासुन दुर ठेवले. एखाद्या प्रतिनिधीची नाराजी ओढवयाची नसेल तर त्यांना वनमंत्री बनवुन समाधान भागावयाची प्रथा राज्यात होती. मागील काळातील सरकारने मुनगंटीवार यांना वन मंत्रालयाचा अतिरिक्त भार सोपविला. काही नतद्रष्ट, बिनकामाच्या बेअकली करंट्यांनी सुधीरचे खच्चीकरण होत आहे, असे गरळ ओकायला प्रारंभ झाला. महाराष्ट्र राज्याच्या वनमंत्रालयाची दखल विदेशात घेतली गेली. सांस्कृतिक मंत्रालयाचा भार मिळाल्यानंतर पुन्हा करंट्यांनी तोच ‘राग’ आलापला आज सांस्कृतिक मंत्रालयाने उल्लेखनिय कार्य कुणापासुन लपुन राहिले नाही. आत्ता पुन्हा काही तरी बोंब घेवून तो राग आलापला जात आहे, बेअकली, जळकुट्या राजकारणी करंट्याचे हे अज्ञान आता जागरूक मतदार – सुज्ञ नागरिक समजु लागले आहे. ‘संधी’चे ‘सोने करणारे प्रतिनिधी म्हणजेचं सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार ! असे आता जनताचं म्हणु लागली आहे. स्वतः खचुन न जाता उपद्रवी विरोधकांचे उपद्रव पालखे पाडुन व स्थीर राहण्याची कला मुनगंटीवार यांच्यामध्ये आहे, ती अनेकदा त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध ही केली आहे.
यापुर्वीच्या खेपेला कोरोना काळात अडीच वर्षाचा कार्यकाळ त्यांना विरोधी बाकावर बसुन ‘आमदार’ म्हणु काढावा लागला. जनतेने जनतेसाठी निवडुन दिलेले आपण प्रतिनिधी आहोत, आपल्याला जनतेची कामे करायची आहे, याचे भान त्यांना होते, म्हणुन त्यांनी जिल्ह्यातील शासकीय कामांची स्थिती जाणुन घेण्यासाठी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका आयोजित केल्या. जिल्ह्यातील काही नेत्यांच्या पोटात यामुळे दुखू लागले व त्यांनी ते फक्त आमदार आहेत, त्यांच्या मिटींग ला तुम्ही उपस्थित राहण्याची गरज नाही, म्हणत अधिकाऱ्यांना खडसावले. लगेच मुनगंटीवारांकडे लोकलेखा समितीचे अध्यक्षपद आले व त्या जळजळ करणाऱ्या प्रतिनिधी (?) पालथे पडावे लागले. आपले वजन कुठे व कसे वापरायचे ? त्याचा जनहितासाठी कसा फायदा होईल, यात मुनगंटीवार सुधीर यांचा कुणीही हात पकडू शकत नाही. “खुद – ईको को कर बुलंद इतना तकदीर से पहले, खुदा बंदे से खुद पुछे, बता तरी रझा क्या है.” असे एका प्रसिद्ध शायरने म्हटले आहे. ते सुधीरभाऊ यांचेवर तंतोतंत जुळणारे आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका २० नोव्हेंबर ला होवू घातल्या आहे. दोनदा बल्लारपूर-मुल विधानसभा क्षेत्राचे यशस्वी नेतृत्व केलेले सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार यावेळी याच क्षेत्रातुन नेतृत्वाची संधी मतांच्या रूपात मागत आहे. बल्लारपूर- मुल-पोंभुर्णा या शहराचे बदलले रंगरुप विकास पुरूषाच्या कामाची पावती आहे. फक्त निवडणुकीसमोर मतदारांना सामोरे जाणाऱ्यांना जनता त्यांची जागा नक्कीच दाखवेल व मतदारांना ती दाखवायचीचं आहे. तुर्तास एवढेच…! जयभिम…! आमेन….! नमस्ते….! वंदेमातरम्….!