• बुध्द पूर्णिमा समारोह समिती पेपर मिल ने आरक्षणाचे वर्गीकरण व क्रीमिलियार विषयावर खुले चर्चा
सुवर्ण भारत: किरण घाटे
विशेष प्रतिनिधी
बल्लारपूर : एससी, एसटी आरक्षणाचे वर्गीकरण व क्रीमिलियार या विषयावर खुले चर्चा सत्राचे आयोजन ७ नोव्हेंबर ला बुध्द पूर्णिमा समारोह समिती पेपर मिल बल्लारपूर ने आयोजित केले. त्यात बल्लारपूर विधानसभा उमेदवाराला पाचारण केले आहे. अशी माहिती समिती द्वारे पत्रकार परिषदेत दिली आहे. ७ नोव्हेंबर ला येथील एकदंत लॉन मध्ये सायंकाळी ४ वाजता एससी, एसटी आरक्षणाचे वर्गीकरण व क्रिमीलीमर यावर खुली चर्चा आयोजीत केलेली आहे. सदर कार्यक्रमात ७२ बल्लारपूर विधानसभेतील उमेदवार यांना पाचारण करण्यात आले आहे.
सुप्रीम कोर्टाने ०१ आगस्ट २०२४ ला एससी, एसटी आरक्षणाचे वर्गीकरण व किमीलीखर ची अट लावण्यासंदर्भात निर्णय दिलेला आहे.
या निर्णयामुळे एससी, एसटी समाजामध्ये या निर्णयाप्रती द्विधा मनस्थीती निर्माण झालेली आहे. या निर्णयावर सर्वपक्षीय उमेदवारांची भुमिका जाणुन घेण्याकरिता, या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
या कार्यक्रमात खासदार प्रतिभा धानोरकर आणि विषयाचे अभ्यासक जेष्ठ अधिवक्ता शंकरराव सागोरे यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे यावरून समाजाला या विषयाचे महत्व व निश्चीती स्पष्ट होईल. या पत्रकार परिषदेत बुध्द पौर्णिमा उत्सव समितीचे कार्याध्यक्ष रितेश बोरकर, अध्यक्ष विश्र्वास देशभ्रतार, सचिव आकाशकांत दुर्गे, आनंद वाळके, मुकेश अलोणे, ऍड पवन मेश्राम, अतुल शेंडे यांची उपस्थिती होती.