Home Breaking News • बांग्लादेश भविष्यात डोळे वटारेल,चीन-पाकिस्तानच्या पंक्तीतलाच.. • हंसराज अहीरांनी २०१७ मध्ये...

• बांग्लादेश भविष्यात डोळे वटारेल,चीन-पाकिस्तानच्या पंक्तीतलाच.. • हंसराज अहीरांनी २०१७ मध्ये केले होते वक्तव्य

60

• बांग्लादेश भविष्यात डोळे वटारेल,चीन-पाकिस्तानच्या पंक्तीतलाच..

• हंसराज अहीरांनी २०१७ मध्ये केले होते वक्तव्य

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

नागपूर/चंद्रपूर/यवतमाळ:- तत्कालीन केंद्रीय गृह राज्यमंत्री पदावर असतांना हंसराज अहीर यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये ‘देशाअंतर्गत सुरक्षा’ या विषयावर असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया द्वारा आयोजित परिषदेत बोलतांना चीन, पाकिस्तान सारखे बांग्लादेश सुध्दा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेबाबत भविष्यात संभाव्य धोका ठरू शकतो असे अतिशय गंभीर विधान एकंदर परिस्थिती ओळखून केले होते.

बांग्ला देशातील हिंदुवर होत असलेले वाढते हल्ले, अन्याय व अमानुष अत्याचाराच्या पार्श्वभुमीवर हंसराज अहीर यांनी तेव्हा केलेले वरील वक्तव्य आज प्रत्यक्षात घडत आहे. बांग्लादेशातील भयावह परिस्थिती पाहता भारतापूढे फार मोठे आव्हान उभे झाले आहे.

बांग्लादेशात हिंदुंचा अनन्वित छळ होत असून त्यांची घरे जाळली जात आहेत. त्यांच्या संपत्तीची लूट होत आहे. अमानुष अत्याचार, लुटपाट, जबरी धर्मांतरणासारखे प्रकार घडत असल्याने हिंदुंवरील या अन्यायाच्या विरोधात भारतीय हिंदु व अन्य समाज दु:खी असून याचा प्रखर विरोध करीत अनेक हिंदुत्ववादी संघटना व अन्य सामाजिक संघटनाच्या माध्यमातून या अन्यायाविरोधात होणाऱ्या संपूर्ण देशभरात असंतोष व आक्रोश व्यक्त करीत निषेध आंदोलन होत आहेत.