Home Breaking News ⬜🌼⬜–आई–⬜🌼⬜

⬜🌼⬜–आई–⬜🌼⬜

9

⬜🌼⬜–आई–⬜🌼⬜

आज चार महिने झाले
आई तुला जाऊनी
तुझ्या शिवाय प्रत्येक क्षण
वाटे मज वर्षावानी //१//

शाळेतून घरी आल्यावर
जेव्हा बंद दरवाजा उघडते
का कुणास ठाऊक पण
न कळत नयनी अश्रू येते //२//

चेहऱ्यावर हास्य ठेवून
सर्वान समोर वावरते
हास्या मागील अश्रू
आई कोणाला न कळते //३//

खूप करते प्रयत्न मी
सदैव प्रसन्न राहण्याचा
पाणावतात डोळे माझे
मनी येता विचार तु नसण्याचा //४//

मिस यू आई😰😰😰

⬜कु.मंगल शामराव मिसाळ ठाणे