• हिरालाल लोया विद्यालयात विविध सहशालेय उपक्रमांचे आयोजन
सुवर्ण भारत:खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा
वरोरा : शिक्षण म्हणजे बालकांच्या शरीर मन व आत्मा यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे होय. याचाच अर्थ विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे म्हणजे शिक्षण होय आणि हा सर्वांगीण विकास केवळ पाठ्यपुस्तकातून पूर्ण होण्यास काही मर्यादा प्राप्त होतात या मर्यादा सहशालेय उपक्रमातून साध्य करणे शक्य होऊ शकते म्हणून सध्य पाठ्यपुस्तकात व पाठ्यंशात सहशालेय उपक्रमाचे महत्त्व अतुल्य आहे हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून सहशालेय उपक्रमांचे अचूक नियोजन हिरालाल लोया विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात दरवर्षी केले जाते.
दिनांक 9 डिसेंबर 2024 ला हिरालाल लोया विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय,वरोरा येथे मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,पुष्परचना स्पर्धा,सलाद डेकोरेशन स्पर्धा,हस्तकला स्पर्धा या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय महेश डोंगरे सर,उद्घाटक म्हणून गटशिक्षणाधिकारी चहारे सर, प्रमुख उपस्थिती जोशी सर,प्रमुख पाहुणे उपमुख्याध्यापिका मुळे मॅडम पर्यवेक्षिका,आंबटकर मॅडम,पर्यवेक्षक आसुटकर सर, उपप्राचार्य पवार सर उपस्थित होते. या स्पर्धेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी सन्माननीय चहारे सर यांच्या शुभहस्ते पार पडले.
या स्पर्धेला हिरालाल लोया विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रविकांत जोशी सर, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक राखे सर, लोकमान्य विद्यालयचे कलाशिक्षक कांबळे सर यांनी या स्पर्धेला भेट दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका मुळे मॅडम,संचालन राडे सर,आभार प्रदर्शन आस्वाले मॅडम यांनी केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक तथा अभिनंदन केले आणि सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले