• श्री संताजी जगनाडे जयंती निमित्य वरोरा शहरात भव्य शोभायात्रा
• संताजी जगनाडे महाराज च्या जयघोष ने दुमदूमले शहर
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा
वरोरा : तेली समाज गौरव संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची 400 वी चे औचित्य साधून तेली समाजाचे युवक संघटना चे पुढाकाराने वरोरा शहरात पालकी शोभायात्रेचे आयोजन 8 डिसेंबर 2024 ला करण्यात आले होते.
या आयोजन मध्ये विनायक, धर्मशील, दत्ता तडस परिवारांच्या भजन मंडळीने संतांच्या धार्मिक भजनाने पालकी शोभायात्रा मध्ये पूर्णतः उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे लोहकरे के बग्गी मध्ये संताजी जगनाडे महाराजांची मूर्ती ने लोकांचे लक्ष केंद्रित केले होते.महादेव मंदिर चे पालकीमध्ये विराजमान जगनाडे मूर्तिचे स्वागत, दर्शन साठी दिपपूजन घेऊन उभे असणाऱ्यामध्ये वृद्ध महिला कुसुम घाटे विणा ची धून वाजवीतानाचे विषेश दृष्य होते. पालकी शोभायात्रा मध्ये लोकांचे मन वेधून घेणारे विविध प्रकारचे नयनरम्य दृष्य होते. सोबतच छोटी बालके लेझीम सारखे नृत्य करीत भजनाचा ठेका धरून पुढे चालत होते. युवक डीजे चे तालावर भक्तिमय गाण्यांवर नृत्य करीत होते. महाराष्ट्रच दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे वेशभूषा मध्ये घोड्यावर स्वार होऊन युवक मंडळ बँड वाजा सोबत समोर शोभा यात्रा ची शान वाढवीत होते.तेली समाजाचे वरिष्ठ प्रतिष्ठित डॉ. भगवान गायकवाड, शंभूनाथ वरघणे, डॉ. नितीन देवतळे या मान्यवरांचे हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मालयार्पण करण्यात आले. त्यानंतर महात्मा फुले कुंभार वॉर्डात संत गोरोबा काका यांना डॉ. नितीन देवतळे, सुरेश महाजन, शशी चौधरी, प्रवीण गंधारे यांनी माल्यर्पण केले. वीर सावरकर चे प्रतिमेला राजेंद्र वरघणे, अनिल ढगे, त्रिशूल घाटे, योगेश कातोरे व आदी तेली समाजाने मालयार्पण केले. पालकी शोभायात्रा डोंगरवार चौकापासून निघाली तर वणी रोड द्वारकाधीश लान मध्ये शोभायात्रेचा समारोप करून हजारो समजबांधवानी महाप्रसादाचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी तेली समाजाचे वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी परिश्रम घेतले. ट्राफिक सांभाळण्यासाठी पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे आणि त्याचे टीम ने विशेष सहकार्य राहिले. तेली समाजाने सर्व सहकार्य करणाऱ्या पोलीस विभाग व समाज संघटनाचे आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी होणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.