Home Breaking News ⬜💠⬜ माझा भाऊ⬜💠⬜

⬜💠⬜ माझा भाऊ⬜💠⬜

221
Oplus_131072

⬜💠⬜ माझा भाऊ⬜💠⬜

🟡बाबा गेल्यावर झाला
घराचा. तो आधार
माझा भाऊ म्हणजे
मायेचा असे सागर //१//

🟣माझा भाऊराया करी
आईची नित्य सेवा
मित्रांनाही वाटे
नेहमीच त्याचा हेवा //२//

🟢कृष्णा सम सदा पाठीशी
माझा तो. भाऊराया
संकटकाळी येई तो
मदतीला धावूनीया //३//

⚪माझा भाऊ म्हणजे
शितल असा वारा
राग आल्यावर मात्र
चढतो त्याचा पारा //४//

🟢सांभाळी सर्व नातीगोती
जपतो सदा सर्वांना
होऊन स्वतः दुःखी
आनंद देई इतरांना //५//

🔴माझ्या भावाची महती
वर्णावी मी ती किती
त्याच्या सारखा भाऊ
लाभला भाग्यवान मी जगती //६//

🟣💠कु.मंगल शामराव मिसाळ⬜🔲सहज सुचलं सदस्य ठाणे
⬜🔲संकलन -उज्वला निमगडे ⬜🔲दुर्गापूर-चंद्रपूर 🔲