• आज आयटकचा चंद्रपूर जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा!
• आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या या मागणीचे केले निवेदन सादर !
सुवर्ण भारत:प्रांजू मखरे, प्रतिनिधी
चंद्रपूर:आशा व गट प्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या,किमान वेतन लागू करा,दिवाळी बोनस दरवर्षी दोन हजार रुपये देण्यात यावे, कोरोना थकीत मानधन ग्राम पंचायत, नगर परिषद व नगर पंचायत कडून तातडीने देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी
आयटकचे राज्य सचिव विनोद झोडगे पाटील यांच्या नेतृत्वात दिनांक 5 मार्च 2025 रोजी चंद्रपूर जिल्हा परिषद कार्यालय वर विशाल मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. त्या नंतर मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना निवेदन देण्यात आले.
धरणे आंदोलनात आयटकचे जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सप्टेंबर 2018 पासून केंद्र शासनाने मोबदल्यामध्ये कोणती वाढ केली नसून कोरोनाच्या काळात आशा वर्कर व गटप्रवर्तक कडून महत्त्वाचे काम करून घेतल्या नंतर सुद्धा 31 महिन्याचा दरमहा 1000 रू.थकीत मोबदला आता पर्यंत जिल्यातील अनेक ग्राम पंचायत, नगर परिषद व नगर पंचायतने दिलेला नाही. त्याची तातडीने अमंलबजावणी करावी.
कोरोना नंतर ज्या कामाचा मोबदला शासन स्तरावरून मिळत असे त्या कामाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये मोफत मध्ये शक्तीने राबवण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मानधन वाढीकरता केंद्र शासनाचे विरोधात मोठा लढा लढणे गरजेचे आहे. गट प्रवर्तक यांना कंत्राटी कर्मजारी दर्जा देऊन शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे.आशा व गट प्रवर्तक यांना रिटायरमेंट नंतर ५ लाख रुपये ग्रॅज्युटी, १० हजार रुपये मासिक पेन्शन व २ हजार रुपये दिवाळी बोनस आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना मिळावा तसेच त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन किमान वेतन लागू करण्यात यावे,योजना व्यतिरीक्त कामे सांगू नये, विणा मोबदला कोणत्याही कामाची आशा व गट प्रवर्तक यांना शक्ती लादू नये.डिसेंबर पासून वाढीव मानधन थकीत आहे ते त्वरीत कोणत्याही प्रकारची कपात न करता देण्यात यावे !
आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे राज्य सचिव विनोद झोडगे यांनी केले.या वेळी संघटनेच्या जिल्हा सचिव निकिता नीर, सविता गटलेवार,कल्पना जेवईकर,ज्योत्स्ना ठोंबरे, छबु मेश्राम,मीना चौधरी, आयटकचे कार्याध्यक्ष रवींद्र उमाटे, .राजू गईंनवार, भाकप जिल्हा सचिव प्रकाश रेड्डी , प्रदीप चिताडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.