Home Breaking News अवैध रेती वाहतुक करणाऱ्या एका ट्राक्टरवर महसुल विभागाची कारवाई.

अवैध रेती वाहतुक करणाऱ्या एका ट्राक्टरवर महसुल विभागाची कारवाई.

8
Oplus_16908288

अवैध रेती वाहतुक करणाऱ्या एका ट्राक्टरवर महसुल विभागाची कारवाई.

राजेश येसेकर : तालुका प्रतिनिधी भद्रावती

भद्रावती : अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाने कारवाई करीत ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई केली. सदर घटना दिनांक ४ रोज मंगळवार ला रात्रो नऊ वाजता च्या सुमारास तालुक्यातील मानोरा गावाजवळ घडली.

सदर ट्रॅक्टर आष्टा घाटावरून अवैध रेती रेती भरून येत असल्याची गोपनीय माहिती गौण खनिज पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी मानोरा गावाजवळ सदर ट्रॅक्टरवर कारवाई केली. सदर ट्रॅक्टर शेगाव बु, येथील सुशांत कोटकर यांच्या मालकीचे असल्याचे सांगण्यात आले. सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लावण्यात आले असून पुढील कारवाई महसूल विभाग करीत आहे. सदर कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांचे नेतृत्वात नायब तहसीलदार मनोज अकनुरवार, मंडळ अधिकारी समीर वाटेकर, शिपाई निर्दोष फुलभोगे यांनी केली.