• बल्लारपुर शिवसेना (शिंदे गट) चे जोडे मारो आंदोलन
सुवर्ण भारत: विशाल डुंबरे प्रतिनिधी,चंद्रपूर
बल्लारपुर : राज्याचे उपमुख्यमंत्री,शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने,पूर्व विदर्भ संघठक किरण पांडव व सचिव प्रवक्ता व विधानपरिषद आमदार मनीषा कायंदे,संपर्क प्रमुख किशोर रॉय यांच्या सूचनेनुसार,शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील बल्लारपूर येथे, वाल्मिक कराड याला फासी द्या असे नारे,देऊन जाहीर निषेध करण्यात आला. बल्लारपूर, पोंभुर्णा शिवसेनेच्या वतीने बिड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या हा क्रुरतेचा कळस आहे. याप्रकरणी अटकेत असलेला क्रूरकर्मा वाल्मिकी कराड याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हा वाल्मिकी नाही तर वाल्या राक्षस आहे. याचा बल्लारपूर येथे रस्त्याच्या मुख्य रोड वरील जोडे,चप्पल मारून, आंदोलन करून निषेध करण्यात आला. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील बल्लारपूर तालुका येथे शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शिवसेना उपजिल्हाप्रमुख कमलेश शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले.
यावेळी विधानसभा प्रमुख विनोद चांदेकर,तालुका प्रमुख बल्लारपूर जमील शेख, तालुका प्रमुख पोंभुर्णा पंकज वट्टेटीवार,शहर प्रमुख पोंभुर्णा, संतोष पार्लेवार,शहर प्रमुख बल्लारपूर उमेश कुंडले,उपजिल्हाप्रमुख वैद्यकीय बालाजी सातपुते,उपतालुका प्रमुख बंडू पानपट्टे,प्रभू तांड्रा,संतोष येलमूले, संतोष शाश्त्रकार, जिशन शेख ,भावेश बोपचे, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते,आणि शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.