• शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांची तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांची भेट.
राजेश येसेकर: तालुका प्रतिनीधी भद्रावती
भद्रावती : वरोरा व भद्रावती तालुक्यातील हजारो घरकुल लाभार्थ्यांचे घर बांधकाम केवळ रेतीच्या अभावामुळे अपूर्ण अवस्थेत आहे. काहींचे अर्धवट बांधकाम आहे, तर काही कुटुंबांना उघड्यावरच दिवस काढावे लागत आहेत. या गंभीर समस्येवर त्वरित उपाययोजना व्हावी म्हणून वरोरा व भद्रावती तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी (SDO) यांची शिवसेना लोकसभा संघटक ( चंद्रपुर वणी आर्णी क्षेत्र ) चे मुकेश जिवतोडे यांनी वरोरा – भद्रावती तालुक्यातील हजारो घरकुल लाभार्थ्यांसाठी शासकिय दरात रेती मिळावी यासाठी भेट घेऊन शासकीय दरात रेती उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले.
गरीब व गरजू लाभार्थ्यांना शासकीय दरात रेती मिळाली, तर त्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार होईल. शासनाच्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना दिलासा मिळेल.अपूर्ण घरे पूर्ण होतील व हजारो कुटुंबांना सुरक्षित निवारा मिळेल.या विषयावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी मागणी केली आहे.