Home Breaking News #Bhadravti • शिवसेना (उ.बा.ठ)महिला आघाडी व्दारा जागतिक महिला दिन संपन्न ...

#Bhadravti • शिवसेना (उ.बा.ठ)महिला आघाडी व्दारा जागतिक महिला दिन संपन्न • महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

33

#Bhadravti

• शिवसेना (उ.बा.ठ)महिला आघाडी व्दारा जागतिक महिला दिन संपन्न

• महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Oplus_16908288

राजेश येसेकर : तालुका प्रतिनिधी भद्रावती

भद्रावती : शिवसेना (उबाठा) चंद्रपुर जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत 75-वरोरा-भद्रावती विधानसभा महिला आघाडी तर्फे 9 मार्च ला श्री मंगल कार्यालय भद्रावती येथे जागतिक महिला दिन निमित्त विविध संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख तथा विरोधीपक्ष नेते भास्कर जाधव साहेब, चंद्रपूर-आर्णी लोकसभा संपर्कप्रमुख आमदार संजय देरकर साहेब, चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत दादा कदम, चंद्रपूर जिल्हा महिला सर्पक प्रमुख सुषमाताई साबळे यांचे मार्गदर्शनात तसेच चंद्रपूर जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्या सहकार्याने, तालुकाप्रमुख आशाताई ताजने यांचे नेतृत्वात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तसेच वंदनीय सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत दिप प्रज्वलाने करण्यात आले. उपस्थित प्रमुख मान्यवर जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ता सुषमाताई शिंदे, निलीमाताई शिंदे, तालुका प्रमुख नंदू पढाल, डॉ. प्रिया शिंदे, उपजिल्हा संघटीका मायाताई नारळे, माजी सभापती तथा भद्रावती तालुका संघटीका आशाताई ताजणे, वरोरा तालुका संघटीका सरलाताई मालोकर, वर्षाताई ठाकरे, गायत्रीताई यमलावार यांचे स्वागत सत्कार शाल व पुष्पगुच्छ देवून करण्यात आले तसेच उपस्थित प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व विचार व्यक्त केले.
महिला दिनानिमित्त सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिला व मुलींनी विविध सामुहिक नृत्य तसेच कविता सादर केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता महिला आघाडी भद्रावती तालुका व शहर यांनी मेहनत घेतली. असंख्य महिला भगीनींच्या उपस्थितीत जागतिक महिला दिन कार्यक्रम भद्रावती येथील श्री मंगल कार्यालय येथे हर्षोल्लासात संपन्न झाला.