#Beed
प्रिय ,,,आंबेडकर वादयानों,,,!!
लेखक, संतोष कांबळे, (विद्रोही लेखक, पत्रकार, समाजशास्त्रज्ञ
सुवर्ण भारत ::गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी
8087175712
प्रिय आंबेडकरी समाज आणि आंबेडकर वादयानो आपल्या आयुष्याची गुलाम गिरी संपवणारया आणि माणसाचे जीवन अर्पण करणार्या महामानव डॉ, भीमराव आंबेडकर या युगपुरुषाची जयंती साजरी करण्या साठी आपण युध्द पातळीवर कामाला लागलो आहोत हे आपण जीवंत असल्याचे लक्षण आहे असे समजायला हरकत नाही ,पुढच्या वर्षी पुन्हा तेच, तेच,,, कदाचित युगाणु, युगे?? पण या महामानवाला वंदन करताना आपण कधी आत्म केंद्री होऊन त्यांनी केलेल्या बलिदानाचा विचार करून त्यांचे अपूर्ण राहिलेले राजकीय, आणि बौद्धमय भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कोणत्या दिशेने वाटचाल करत आहोत हे तपासण्याची गरज आहे, त्यांच्या त्यागातून समाज उच्च शिक्षित झाला, मोठ्या आणि महत्वाच्या पदांवर कार्यरत झाला परंतु त्यांनी ओढत आणलेला सामाजिक समतेचा गाडा आपण आंबेडकरी पाईक म्हणून कुठे आणून उभा केला आहे याचे आत्मपरीक्षण कधी होणार आहे की नाही? आज ही समाजातील आई -बहिणीवर होत असलेले अन्याय, अत्याचार, राजकीय पटलावर आपली होत असलेली घुसमट, समाजातील तरूण पिढीची व्यसनाधीनता, राजकीय नेत्यांच्या दिशाहीन भूमिका, आणि आंबेडकर वादी म्हणून आपली नैतिक जबाबदारी यावर आता चर्चा करायला हवी, अँक्शन मोडवर येऊन आपण आपलीच आणि येणाऱ्या पिढयांची करत असलेली दिशाभूल आता थांबवायला हवी, प्रत्येक पंच वार्षिक निवडणूकीत आंबेडकरी विचाराचा सौदा करून आपल्याच पिढयांची बरबादी उघडया डोळ्यांनी बघण्याची दूर्रदैवी वेळ ओढवण्या पेक्षा पुन्हा एकदा भीमबाबानी ओढत आणलेल्या समतेच्या गाडयाची प्रामाणिक आणि नैतिकतेची धुरा खांद्यावर घेऊन समतेचा भीमरावांचा रथ आता आपण योग्यच ठिकाणी घेऊन जायाला हवा. कारण या रथाची चाके त्या भीमरावांच्या चार ही लेकरांच्या ‘छाती ‘वरून त्यांच्या बलिदानाने रक्त रंजीत करून बाबांनी आपल्या साठी ओढत आणली होती, त्या रथाच्या प्रत्येक चाकावर रमाईच्या सुखाचा त्याग आणि कष्टाची ‘राख ‘ आपल्याला माणुस पणाचा प्रवास करण्यासाठी कारणी लागली आहे. हे भान आपण विसरलो आहोत, गावकुसाबाहेर जन्माला येणारा अंकुर आता पाच मजली माडीत जन्माला येत आहे, प्रस्थापितांच्या शिळया तुकडया वर जगणारा तोच समाज आज पाचपक्वान्नावर ताव मारून रात्रीच्या चांदण्यात सुखाचा आनंद घेत आहे, गाडी, माडी, सोने -चांदी, मखमली, सगळे आले आपल्या कडे पण भीमरावांच्या त्या चार लेकारांच्या बलिदानाची परत फेड आपण कधी करणार आहोत की नाही? रमाईच्या त्या घामाचे मोती आपण कधी करणार आहोत की नाही ? कधी करणार आहोत आपण आपला राजकीय उद्धार,? बाबांच्या विचाराला गद्दार होऊन तर अजिबात नाही!!आज ही कष्टाची भाकरी मिळवायला जाणारी माऊली जेव्हा वाईट नजरेची ‘शिकार ‘होते तेव्हा आपण कशाला आंबेडकर वादी समजायचे!! कारण ही जबाबदारी आता आपल्या वर सोडुन गेलेत ‘साहेब ‘हे विसरून कसं चालेल! आज ही अधिकारी होण्याची स्वप्ने बघणारा पँथरचा ‘बछडा ‘झोपडीत कैद आहे, विश्वसुंदरीचे स्वप्न बघणारी भीमकन्या ‘शिकारयांचे ‘सावज ‘होत आहे, उडाण घेण्यासाठी फैलावलेले पंख अगदी पध्दत शीर धडापासून वेगळे केले जात आहेत, आपल्या राजकीय ताकदीला नादावणया साठी आपलाच ‘राजकीय तमाशा ‘करून पहाटेच्या वेळी’ वगनाटय’दाखवून राजकीय ढोलकी पट्टू सोबत ‘मास्तर ‘सुध्दा ‘पिंजर्यात ‘बंद होईल याची व्यवस्था केली जात आहे आणि आपण मात्र प्रत्येक 14 एप्रिलला बोलो भीमभगवान की,,,!! या एकाच सुराने आंबेडकर वादी समजून गाफील होत आहोत हे लक्षात घ्यायला हवे, नाही तर येणारी पिढी पुन्हा एकदा ‘जोहार मायबाप ‘घालायला लागली तर आपणच आपल्या तोंडात मारून घ्यावे लागेल हे आंबेडकरवादी म्हणणाऱ्या गद्दारांनी ‘लक्षात ठेवावे,,,!!!
लेखक, संतोष कांबळे, (विद्रोही लेखक, पत्रकार, समाजशास्त्रज्ञ (8999180009)