Home Breaking News #Varora प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत पाणलोट विकास उपक्रम जनजागृती जलसंधारण...

#Varora प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत पाणलोट विकास उपक्रम जनजागृती जलसंधारण विभागाची वॉटर शेड यात्रा वरोरा तालुक्यातील उखर्ड्यात

16

#Varora प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत पाणलोट विकास उपक्रम जनजागृती

जलसंधारण विभागाची वॉटर शेड यात्रा वरोरा तालुक्यातील उखर्ड्यात

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा : मृदू व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत वॉटर शेड यात्रा उखर्डा येथे ८मार्च २०२५ ला महिला दिनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉ.डी चंद्रा हे होते तर,कार्यक्रमाचे उद्घाटक सभापती कृषी उत्पंन बाजार समिती वरोरा डॉ.विजय देवतळे व प्रमुख पाहुणे तहसीलदार योगेश कौटकर,जिल्हा जलसंधारण अधिकारी चंद्रपूर नीलिमा मंडपे,उपविभागीय अभियंता जलसंधारण विभाग वरोरा सुमित शेंडे,तालुका कृषी अधिकारी रवी राठोड,उपविभागीय कृषी अधिकारी कविता हरीणखेडे,सरपंच रुपाली ठाकरे,पोलीस पाटील कल्याणी कुडे, गुरुवर्य भाऊराव वैद्य,उपसरपंच प्रमोद फरकाडे,सर्व ग्रामपंचायत सदस्य या मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांची शेती सुपीक होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी केंद्र शासन व राज्यशासन विविध उपाय योजनेतून व उपक्रमाचे माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय घेत असून शेतकरी हा समृद्ध व्हावा यामागचा शासनाचा उद्देश दिसून येतो आहे.
पाणलोट यात्रा ही प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या डब्लू डी सी – पी एम के एस वाय २.० पाणलोट विकास घटकांतर्गत राबविल्या जाणाऱ्या पाणलोट विकास उपक्रमाबद्दल जनजागृती करण्यासाठी जनजागरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.यां अनुषंगाने वरोरा तालुक्यातील उखर्डा येथे वॉटर शेड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर जनजागृती मोहिमेत लोकार्पण,बंधारे भूमिपूजन,वृक्षारोपण करून मार्गदर्शन करण्यात आले.प्रत्येक जिल्ह्यात नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन ,लोकार्पण,पाणलोट महोत्सव,श्रमदान,पाणलोट की पंचायत,पाणलोट वॉरियर्स आणि भूमिजल पीच इत्यादींना पुरस्कार आणि मान्यता स्वेच्छेने स्थानिक समुदाय आणि युवाससंखेच्या सहभागासह नियोजित उपक्रमाचा सहभाग पाणलोट यात्रा मध्ये अंतर्भूत आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट विकास घटक २.० प्रकल्प जिल्ह्यात ६५ गावामध्ये राबविण्यात येणार असून याद्वारे२२ हजार २० हेक्टर क्षेत्र पाणलोट उपायाखाली येणार आहे.या उपक्रमाबद्दल जनजागृती व लोकशिक्षण होण्यासाठी जिल्ह्यातील १४ गावांमध्ये ग्रामस्थांच्या दारापर्यंत पाणलोट यात्रा लवकरच पोहचणार असल्याचे उपस्थित जलसंधारण अधिकाऱ्यांनी कार्यक्रमात सांगितले आहे.
—————————+++—-
प्रकल्पासाठी सामाईक मार्गदर्शक सूचना

केंद्रीय भुसंधारण विभाग ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.०या प्रकल्पासाठी सामाईक मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत.त्याअनुषंगाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे.
—–++—————————-
इंडो जर्मन पाणलोट विकास
स्थानिकांच्या क्षमता

वृध्दीसाठी या योजने अंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन घटकांतर्गत पाणलोट विकासाची कामे करण्यात येतात.तसेच उपजीविका उपक्रम ,उत्पादन पद्धती अंतर्गत पात्र लाभार्थीना लाभ देण्यात येतो.या योजनेची स्थानिक समुदायामध्ये जागरूकता निर्माण करून जनजागृती करण्यासाठी ,तसेच लोकसहभागातून योजनेच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी केंद्र.शासनामार्फत पाणलोट यात्रा सुरू करण्यात आली आहे.