विवेकानंद विद्यालयात महिला दिन संपन्न
राजेश येसेकर : तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती दि.9: स्थानिक विवेकानंद माध्यमिक विद्यालयात ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला पालक मेळावा व विद्यालयाच्या माजी होतकरु विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
मंचावर अध्यक्ष स्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना बांदूरकर, प्रमुख अतिथी स्थानी संगीता खारटकर, रुपा इंगोले, अर्चना सतीबावणे या महिला पालक तसेच विद्यालयातील शिक्षिका आशा गावंडे, शीतल जीवने, मीना डवरे आणि माजी विद्यार्थिनी डॉ. कु. श्रुतिका बंडू कांबळे व कु. निशा मारोती खंडाळकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
प्रास्ताविक करताना आशा गावंडे यांनी जागतिक महिला दिनाची पार्श्वभूमी विशद केली.
अर्चना सतीबावणे, संगीता खारटकर, रुपा इंगोले यांनीही समयोचित वक्तव्ये केली.
विद्यालयाची माजी विद्यार्थिनी डॉ. कु. श्रुतिका बंडू कांबळे हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आपल्या सत्काराला उत्तर देताना तिने विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील करिअर संबंधी आणि आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून प्रगती करायची असेल तर काय करणे आवश्यक आहे यासंबंधी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषण करताना मुख्याध्यापिका कल्पना बांदूरकर यांनी आज सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून कश्या अग्रेसर होत आहेत, हे विविध उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना सांगितले. एक मुलगी म्हणून, एक महिला म्हणून आपण कुठेही कमी नाही व कुठेही कमी पडता कामा नये, असे आपल्या वक्तव्यातून विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले.
कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन कु. रतीका आस्वले व आस्था बारतीने या विद्यार्थिनींनी केले.
कार्यक्रमाला गुप्ता, सीमा सावंकर आदी महिला पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शविली होती.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील शिक्षक दयाकर मग्गीडवार, संजय आगलावे, तुकाराम पोफळे, विनोद गावंडे, मेघा ताजने आणि कर्मचारी रामदास ठक, विश्वनाथ हरबडे, बंडू कांबळे, शुभांगी दैवलकर आदींनी सहकार्य केले.