Home Breaking News #chandrapur • जिजाऊ रथयात्रा येत्या 10 एप्रिल रोजी चंद्रपूरात :स्वागताची जय्यत...

#chandrapur • जिजाऊ रथयात्रा येत्या 10 एप्रिल रोजी चंद्रपूरात :स्वागताची जय्यत तयारी

38

#chandrapur

जिजाऊ रथयात्रा येत्या 10 एप्रिल रोजी चंद्रपूरात :स्वागताची जय्यत तयारी

सुवर्ण भारत :किरण साळवी,विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर: मराठा सेवा संघ ही नोंदणीकृत सार्वजनिक संस्था असून, गेल्या 35 वर्षापासून समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी परिवर्तनवादी, प्रगतशिल आणि सकारात्मक् कार्य करीत आहे. समाजाच्या हितासाठी विविध 33 कक्षांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशपातळीवर कार्यरत असलेल्या मराठा सेवा संघाने अनेक ऐतिहासिक उपक्रम राबविले आहे.
आज आपल्या समाजासमोर मोठी आव्हाने उभी आहेत. जातीयवाद, गुन्हेगारी, भ्रष्ठचार, धार्मिक, आणि राजकीय उन्माद यांसारख्या अनेक कारणांनी सामाजिक एकता धोक्यात आली आहे. धार्मिक सलोखा दुभंगला आहे आणि समाजाची मजबूत विणा विस्क्‌टत चालली आहे. समाजामध्ये संशयाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे समाजमन अस्वस्थ, संशयग्रस्त आणि असुरक्षित वाटत आहे. त्याचा थेट परिणाम आपल्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेवर होत आहे.
ही परिस्थिती बदलण्यासाठी युवक-युवती, विद्यार्थी, शेतकरी, पौढ महिला-पुरूष यांच्याशी संवाद साधण्यासाठी, समाजाला एकसंघ करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात बंधुभाव जपत आपल्या ऐक्याचा जागर घालण्यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ रथयात्रा 2025 अंतर्गत मराठा सेवा संघाच्या वतीने 18 मार्च ते 1 मे दरम्यान महाराष्ट्रभर सर्व जाती-धर्मीय समाज जोडो अभियान हे ब्रीद घेऊन जिजाऊ रथयात्रा फिरणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात येत्या 10 एप्रिल रोजी स्वागतासाठी दुपारी 2:30 वाजता वरोरा, दु. 3:30 वाजता भद्रावती, दु. 4:00 वाजता घोडपेठ, दु. 4:30 मोरवा सायं. 5:00 वाजता पडोली, सायं. 5:30 वाजता संत तुकाराम महाराज चौक व सायं. 6:00 वाजाता रथयात्रा व रॅली जनता कॉलेज चौक पासून जूना वरोरा नाका चौक-उडान पूल-रामनगर पोलीस स्टेशन-बस स्टॉप-प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक ते न्यु इंग्लिश कनिष्ठ् महाविद्यालयाचे मैदान येथे सायंकाळी 7:00 वाजता सभा घेण्यात येत आहे.
या रथयात्रेत सहपरीवार सहभागी होण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष दिपक जेऊरकर, संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य, चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष इंजि. दिपक खामनकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिलीप चौधरी, उदयोजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष कुचनकर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अर्चना चौधरी, संभाजी ब्रिगेड महानगर अध्यक्ष विनोद थेरे तसेच मराठा सेवा संघाच्या सर्व 33 कक्षाचे पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.