Home Breaking News अवैध रेती वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले.

अवैध रेती वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले.

74

अवैध रेती वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले.

राजेश येसेकर✍️तालुका प्रतिनिधी भद्रावती

भद्रावती : तालुक्यात होत असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा बसावा, या उद्देशाने तहसीलदार राजेशभांडारकर यांनी मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत गौण खनिज पथकाद्वारे कारवाईचे सत्र सुरू आहे.

यात, शनिवार गोपनीय माहितीच्या आधारे नाल्यावरून अवैद्य रेती भरून येत असलेल्या ट्रॅक्टरचे गोपनीय माहिती घोनाळ बस स्टॅन्ड येत असलेल्या दिनांक 12एप्रिल 2025 पहाटे साडेतीन वाजता रेती भरून असलेल्या ट्रॅक्टर वर कारवाई करण्यात आली ,एक ब्रास रेती ची कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वात गौण खनिज पथक नायब तहसीलदार सुधीर खांडरे,मंडळ अधिकारी रमेश आवारी, तलाठी राजूरकर, तुरारे, गजबे वाहन चालक बंडू वेलफुलवार, व पोलीस कर्मचारी, यांनी कारवाई केली ट्रॅक्टर ड्रायव्हर यास अवैद्य रेतीची विचारपूस केली असता, कोणताही परवाना नसल्याबाबत सांगण्यात आले सदर हे वाहन मालक आकाश विठोबा पोल्हे राहणार घोनाळ,यांचे असून अवैद्यरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ताब्यात घेण्यात आले सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात लावण्यात आले ,यामुळे अवैद्य रेती तस्कराचे धाबे दणाणलेआहे.