Home Breaking News #Bhadravti • अपंग व्यक्तीच्या समस्या समजावून घ्याव्यात — राजू गैनवार

#Bhadravti • अपंग व्यक्तीच्या समस्या समजावून घ्याव्यात — राजू गैनवार

27

#Bhadravti
• अपंग व्यक्तीच्या समस्या समजावून घ्याव्यात — राजू गैनवार

सुवर्ण भारत:राजेश येसेकर
तालुका प्रतिनिधी, भद्रावती

भद्रावती : येथे नुकतेच तुलसी दिव्यांग संस्था भद्रावतीच्या वतीने पानपोई नाग मंदिर परिसर येथे उघडण्यात आले या पानपोई उदघाटन राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष भद्रावती यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्वप्रथम अपंगाचे प्रेरणास्थान ब्रेल लिपी यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजाअरच्या व माल्यार्पण करण्यात आले व प्रमुख पाहुण्याचे पुष्पमालेने स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनाली गावंडे सामाजिक कार्यकर्त्या या होत्या
प्रमुख पाहुणे म्हणून राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष – शंकरराणा वाणी कवी लेखक साहित्यिक – सोनाली गावंडे सामाजिक कार्यकर्त्या इत्यादी हजर होते.
उदघाट्न करताना राजू गैनवार म्हणाले की तुलसी दिव्यांग संस्था ही भद्रावती येथे बरेच वर्षा पासून काम करीत आहे. त्यानी समाजउपयोगी व देशहितासाठी बरेच उपक्रम राबवित आहेत आता सध्या उन्हाळा लागला आहे भद्रावती हे ऐतिहासिक शहर आहे या ठिकाणी बरेचसे बाहेरील पर्यटक येत असतात येणे जाणे करणाऱ्याना व वाटसरू आणि लोकांना कामा निमित्य कार्यालयामध्ये येत असतात त्यांना पाण्याची गरज असते उन्हाळ्यात पाण्याची सक्त गरज असते त्यांची तहान भागविण्याकरीता पानपोई उघडण्यात आली आहे अपंगा त्वावर मात करून यशस्वी होता येते या साठी गरज असते प्रोत्साहणाची त्यानिमित्याने समाजामध्ये जनजागृतीची गरज आहे यासाठी अपंग व्यक्तीच्या समस्या समजावून घ्याव्या असे त्यांनी सांगितले
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता दिनेश खोब्रागडे संस्थेचे अध्यक्ष – बाळू कुटेमाटे संस्थेचे सचिव – गणेश वाणी – प्रकाश पिदूरकर इत्यादीनी अथक परीश्रम घेतले