• समाजसेवक प्रमोद नागापूरेंच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रक्तगट व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा
वरोरा : सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नागापूरे आणि त्यांच्या पत्नी यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तगट व विविध रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गुरुवारं दिनांक १५ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजता गुरुदेव सेवा मंडळ सभागृह, परसोडा येथे आयोजित करण्यात येणार आहे.
या शिबिरात रक्तगट तपासणीसह CBC, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन, थायरॉईड तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, सिकलसेल तपासणी आणि HPLC तपासणी अशा अनेक अत्यावश्यक तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे, शिबिरादरम्यान ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत आरोग्य कार्ड काढून मिळणार आहे. यासाठी आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत आणणे बंधनकारक आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण व्हावी आणि गरजू नागरिकांना वेळेवर तपासणी व उपचार मिळावेत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. समाजसेवेची निस्वार्थ भावना ठेवून प्रमोद नागापूरेंनी घेतलेला पुढाकार परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.
