#Bhadravti
•भद्रावती येथे १२ वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन
• विवेकानंद महाविद्यालयाचा उपक्रम
राजेश येसेकर : तालुका प्रतिनिधी भद्रावती 7756963512
भद्रावती : बारावीच्या परीक्षांचा नुकताच निकाल लागलेला आहे.अथक प्रयत्न करूनही ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत अपयश आले आहे. अशा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी येत्या जुन, जुलै महिन्यात नागपूर बोर्ड पुन्हा परीक्षेचे आयोजन करणार आहे. विद्यार्थी हित व सामाजिक बांधिलकी लक्षात घेत स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात १२वी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वच विषयांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी निःशुल्क मार्गदर्शनपर शिकवणी वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १५ मे पासून स्थानिक विवेकानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या निःशुल्क मार्गदर्शनपर वर्गाचा भद्रावती शहर व परिसरातील १२ वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा ग्रंथपाल डॉ. सुधीर आस्टुनकर यांनी केले आहे. संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, सचिव अमन टेमुर्डे तथा सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आयोजित या विशेष मार्गदर्शनपर शिकवणी वर्गात मार्गदर्शन घेऊन यशस्वी होता येईल. अपरिहार्य कारणामुळे यशस्वी होता आले नाही. त्यांनी निराश होऊ नये. पुन्हा नव्याने तयारी करून यशस्वी होण्याची संधी त्यांना लाभणार आहे. सामाजिक बांधिलकी व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत महाविद्यालयाने या उपक्रमाचे आयोजन केले. इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील ग्रंथालयात आधी नोंदणी करून घ्यावी व या वर्गांचा निःशुल्क लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
