Home Breaking News #Bhadravti • ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर • भद्रावती ग्रामस्थांना लागली उत्सुकता

#Bhadravti • ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर • भद्रावती ग्रामस्थांना लागली उत्सुकता

67

#Bhadravti
• ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
• भद्रावती ग्रामस्थांना लागली उत्सुकता

सुवर्ण भारत✍️राजेश येसेकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती

भद्रावती : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा यांच्या आदेशानुसार येथील तहसीलदार राजेश भांडारकर यांनी भद्रावती तालुक्यातील ६९ ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने काढण्यासाठी दि.२३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता येथील चंद्रपूर – नागपूर महामार्गावरील मारोतराव पिपराळे सभागृहात एका सभेचे आयोजन केले आहे.

या सभेला सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्राम पंचायत सरपंच, सदस्य व इच्छूक ग्रामस्थ यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार राजेश भांडारकर यांनी केले आहे. सन २०२५ ते २०३० असा या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कालावधी राहणार आहे.

या सार्वत्रिक निवडणुकीत भद्रावती तालुक्यातील एकूण ६९ ग्रामपंचायत निहाय सन २०२५-२०३० या ५ वर्षांच्या कालावधीसाठी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग आणि खुल्या प्रवर्गातील महिलांकरीता सरपंच पदाची आरक्षण सोडत  होणार आहे.

या आरक्षण सोडत सभेच्या संदर्भात संबंधित ग्रामपंचायतीच्या सचिवांनी आपल्या स्तरावर आरक्षण सोडतबाबतची जाहीर सूचना ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावायची आहे.तसेच  गाव चावडीवर मुनादीव्दारे प्रसिध्दी द्यायची आहे. तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील सरपंच / उपसरपंच व सर्व सदस्य तसेच इच्छूक ग्रामस्थांना हजर राहण्याच्या सूचना आपल्या स्तरावरुन द्यायच्या आहेत. संबंधित तलाठ्यांनीसुद्धा आपल्या स्तरावर आपल्या तलाठी कार्यालयाच्या सूचना फलकावर जाहीर सूचना लावून प्रसिध्दी द्यायची आहे.