Home Breaking News • महावितरण कार्यलयात रात्री पाळीत कर्मचारी ठेवा व हेल्पलाईन नंबर जाहीर करा!...

• महावितरण कार्यलयात रात्री पाळीत कर्मचारी ठेवा व हेल्पलाईन नंबर जाहीर करा! • काँग्रेसची मुख्य अभियंताला निवेदनातून मागणी

47
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

#Ghugus
• महावितरण कार्यलयात रात्री पाळीत कर्मचारी ठेवा व हेल्पलाईन नंबर जाहीर करा!

• काँग्रेसची मुख्य अभियंताला निवेदनातून मागणी

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घूस : चंद्रपूर जिल्हा हा सध्या देशातील सर्वात उष्ण जिल्हा असल्याचे सिद्ध झाले आहेत
जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर असलेल्या घुग्घूस शहरात भिषण अशी गर्मी वाढलेली असून अश्या जीवघेण्या गर्मीत ही नागरिक दिवसभर काम करीत असतात रात्री त्यांची झोप होने आवश्यक आहे.

रात्रीच्या वेळेस अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होत असतात गर्मीने त्रस्त झालेले नागरिक महावितरण कार्यालयाला संपर्क करण्याचा प्रयत्न करतात मात्र फोन लागत नाही.
कार्यलयात गेलं तर तिथे कुणी ही राहत नाही यासंदर्भातील तक्रार नागरिकांनी काँग्रेस कार्यलयात केली असता

काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यलयाचे मुख्य अभियंता भटरकार यांची भेट घेऊन त्यांना समस्या सांगितल्या व लिखित निवेदन देऊन रात्रीच्या पाळीत कार्यलयात कर्मचारी नियुक्त करणे व नागरिकांना तक्रार निवारणा करीता हेल्पलाईन नंबर जाहीर करण्याची मागणी केली असता काँग्रेस शिष्टमंडळाची दखल घेऊन दोन चार दिवसात नियमित प्रमाणे रात्री पाळीत दोन कर्मचारी ठेवण्याचे तसेच नवीन हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध करण्याचे मुख्य अभियंता यांनी मान्य केले आहे.

शिष्टमंडळात काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा महासचिव अलीम शेख,तालुका सचिव विशाल मादर, सुनील पाटील,विजय माटला,एन. एस. यु. आय अध्यक्ष आकाश चिलका,कपिल गोगला, दिपक पेंदोर, रोहित डाकूर, नुरुल सिद्दीकी, बालकिशन कुळसंगे, देव भंडारी,अरविंद चहांदे, कुमार रुद्रारप,दिपक कांबळे, शहंशाह शेख,अंकुश सपाटे,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते