Home Breaking News #Bhadravti • शेतीच्या वादातून शेतकऱ्यांनी विष घेऊन केला आत्महत्याचा प्रयत्न

#Bhadravti • शेतीच्या वादातून शेतकऱ्यांनी विष घेऊन केला आत्महत्याचा प्रयत्न

66
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

#Bhadravti
• शेतीच्या वादातून शेतकऱ्यांनी विष घेऊन केला आत्महत्याचा प्रयत्न

राजेश येसेकर✍️तालुका प्रतिनिधी भद्रावती

भद्रावती : वरोरा तालुक्यातील बामर्डा येथील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हेमंत पंढरी हरबडे वय 40 वर्ष राहणार बामर्डा या शेतकऱ्याने शेतातील कीटकनाशक द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न स्वतःच्या राहत्या घरी केला.
हरबडे परिवाराला सिलिंग मधील बारा एकर जमीन मिळाली होती. यामध्ये पंढरी हरबडे व चंपत हरबडे यांना सहा- सहा एकर जमीन मिळाली होती. यानंतर पंढरी हरबडे मृत पावल्यानंतर त्यांचा मुलगा हेमंत पंढरी हरबडे वडीलाची जमीन वाहत होता. मात्र मिळालेली जमीन ही बारा एकरची नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला होता. यासाठी महसूल विभागाकडे काका पुतण्यांनी जमीन मोजण्यासाठी वारंवार प्रयत्न केला. मात्र प्रत्येक वेळेस जमीन कमी पडत होती. सामायिक जमीन 12 एकर चा पट्टा मोजून नंतर अर्धी अर्धी करण्यात यावी असा युक्तिवाद हेमंत हरबळे यांनी केला होता. मात्र या शेतकऱ्याचे म्हणणे कोणीच ऐकून घेत नव्हते. यानंतर चंपत हरबडे यांनी मोजणीला टाकलेली स्वतःची सहा एकर जमीन मोजण्यात आली. व फेंसिंग साठी गड्डे खोदण्याचे काम पोलिस प्रोटेक्शन मध्ये सूरू करण्यात आले होते.
मात्र शेतामधील फेन्सिंगचे गड्डे हेमंत हरबडे यांच्या शेतामध्ये आल्याने त्यांच्या पत्नीने गड्डे खोदण्यास नकार दर्शविला. संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जोर देत शेतामध्ये गड्डे खोदायला सुरुवात केली. त्यामुळे हेमंत पंढरी हरबळे यांनी वारंवार होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध दाद न मिळाल्यामुळे शेतातील किटकनाशक द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी हजर असलेले पोलीस कर्मचारी यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. तात्काळ शेतकऱ्याला माढळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर वरोरा उपजिल्हा रुग्णालयात शेतकऱ्याला हलवण्यात आले. यानंतर शेतकऱ्याची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र हा वाद गेल्या तीन-चार वर्षांपासून सुरू असून यामध्ये कोणताच तोडगा निघत नसल्यामुळे शेतकऱ्याने विष प्राशन केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. शेतकऱ्याला साधा न्याय मिळवण्यासाठी विष प्राशन करावे लागते ही खरंच दुःखाची गोष्ट आहे. यावरून प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किती गंभीर आहे हे दिसून येत आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.