Home Breaking News #Bhadravti • ग्राससेवकाने ग्रामपंचायत फंडातुन ३५ लाख रूपयांचा अपहार • १५...

#Bhadravti • ग्राससेवकाने ग्रामपंचायत फंडातुन ३५ लाख रूपयांचा अपहार • १५ दिवसात ग्रामसेवक यांचे विरोधात पोलिसांत तक्रार . दाखल करा अन्यथा न्यायालयात दाद मागु

107
Oplus_16908288

#Bhadravti
• ग्राससेवकाने ग्रामपंचायत फंडातुन ३५ लाख रूपयांचा अपहार

• १५ दिवसात ग्रामसेवक यांचे विरोधात पोलिसांत तक्रार . दाखल करा अन्यथा न्यायालयात दाद मागु

राजेश येसेकर ✍️तालुका प्रतिनिधी भद्रावती 7756963512

भद्रावती : तालुक्यातील मांगली ( रै ) ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाने आपल्या कार्यकाळात विविध योजने मधून ३५ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करुन या प्रकरणात संबंधित वरिष्ठ अधिकारी त्याला वाचविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचा ठपकाही प्रशांत काळे आणि ग्रामस्थांनी केला.

विभागीय आयुक्ताचा भेटुन या प्रकरणात १५ दिवसात अपहार करणारे ग्रामसेवक धिरधम्म रायपुरे यांचे विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश द्यावे. अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागु त्यात आरोपीना सहकार्य करणारे विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, आणि चौकशी अधिकारी यांच्याविरुद्ध प्रकरण चालू असे यावेळी सांगितलं