
#Ghugus
• घुग्घुसच्या सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रामध्ये ‘निराधार’ लाभार्थ्यांची गर्दी
• सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र सेवेसाठी सदैव तत्पर: विवेक बोढे
सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
घुग्घुस : सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रामध्ये जीवन प्रमाणपत्र काढण्यासाठी ‘निराधार’ लाभार्थ्यांनी मोठी गर्दी केली.
शासना तर्फे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकण्यात येते. त्यासाठी आता जीवन प्रमाणपत्र मागण्यात येत आहे. त्यामुळे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची जीवन प्रमाणपत्र काढण्याकरिता लगबग सुरु झाली आहे.
सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रा तर्फे नि:शुल्क ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र काढून देण्यात येत आहे. तसेच आतापर्यंत शेकडो लाभार्थ्यांना नि:शुल्क जीवन प्रमाणपत्र काढून देण्यात आले आहे.
सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र हे गोर गरीबांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. लाभार्थ्यांनी नि:शुल्क जीवन प्रमाणपत्र काढण्यासाठी सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी केले आहे.