Home Breaking News युतीची प्रचार रॅली- आ. किशोर जोरगेवार रॅलीत सहभागी!

युतीची प्रचार रॅली- आ. किशोर जोरगेवार रॅलीत सहभागी!

51

युतीची प्रचार रॅली- आ. किशोर जोरगेवार रॅलीत सहभागी!

चंद्रपूर -◾किरण घाटे ◾

येत्या 15 जानेवारीला चंद्रपूर शहर महानगरपा

लिकेची सार्वत्रिक निवडणूक होत असून या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांसोबतच सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार आपले भाग्य अजमविण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
आज रविवारला सकाळी ११ वाजता शहरात युतीची एक भव्य रॅली निघाली.
या रॅलीत चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार हे सहभागी झाले होते.
या शिवाय या भव्य रॅलीत एकोरी मंदिर प्रभाग मधून नगरसेवक पदाकरीता निवडणूक रिंगणात उतरलेले उमेदवार राजू गणपत येले, सरिता विकास घटे,इसमत राशेद हुसेन शेख नाशिर शेख अहेमद, भाजप, शिवसेना व आरपीआयचे आठवले गटाचे जेष्ठ नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येंने सहभागी झाले होते.
सध्या शहरातील प्रत्येक प्रभागात राजकीय नेते व पदाधिकारी मोठ्या जोमाने आपल्या उमेदवारांचा प्रचार करीत असल्याचे दिसून येत आहे.
सकाळपासून तर संध्याकाळ पर्यंत उमेदवार घरोघरी फिरुन मताचा जोगवा मागत आहे.
शेवटच्या टप्प्यात प्रचाराने चांगलाच जोर पकडला असून काही प्रभागात तिहेरी व चौरंगी लढतीचे संकेत आहे.
अपक्ष उमेदवारही प्रचारात मागे नाही.ते ही आपल्या प्रभागात घर ते घर प्रचार करीत असल्याचे शहराचा फेरफटका मारला असता दिसून आले.
◾काही प्रभागात राजकीय पक्षांकडून आपआपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोठ्या नेत्यांच्या दिवसभरात तीन ते चार सभा आयोजित केल्या आहेत.