Home Breaking News दोन दुचाकींची समोरासमोर धड़क १ ठार तर २ गंभीर जखमी ! 🔳एटापल्ली...

दोन दुचाकींची समोरासमोर धड़क १ ठार तर २ गंभीर जखमी ! 🔳एटापल्ली जवळील घटना

56

• दोन दुचाकींची समोरासमोर धड़क १ ठार तर २ गंभीर जखमी !
• एटापल्ली जवळील घटना

गडचिरोली  विशेष प्रतिनिधी◾

दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात १ जण ठार तर दोन जण गंभीर जख्मी झाल्याची घटना शनिवार दि.१० जानेवारीला दुपारी ४ वाजताच्या सुमारास एटापल्लीपासुन ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गुरूल्ली येथे घडली .
रमेश धर्मा मडावी रा. नालीकोडा तेलंगाणा असे मृतकाचे नांव असल्याचे समजते.सोमजी मडवी (५०) रा कर्पनपुडी ता .एटापल्ली विलास भगवान टेकाम रा .येकापल्ली अशी जखमींची नांवे आहेत .
जखमीना तातडीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार असे कळते कि एटापल्ली तालुक्यातील कर्पणपुडी येथील रहिवासी सोमजी फाकिरा मडावी हे दुचाकीने एटापल्लीच्या दिशेने येत असताना समोरून विलास भगवान टेकाम (३०) रा. येणकापल्ली ता. अहेरी आणि मृतक रमेश धर्मा मडावी रा. नालिकोंडा ता .मानापाल्ली हे विरूद्ध दिशेने येत होते .दरम्यान समोरील वाहनास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही दुचाकी चकनाचुर झाल्या ! रमेश धर्मा मडावी यांचा घटना स्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच मनीष दुर्गे यांनी आपल्या चार चाकी वाहनात बसवून अपघातग्रस्तांना उपचारार्थ एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात आणले .या घटनेचा
पुढील तपास एटापल्ली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.