Home Breaking News आर्थिक विवंचनेतून इसमाची गळफास घेऊन आत्महत्या विसापूर येथील घटना : पत्नी...

आर्थिक विवंचनेतून इसमाची गळफास घेऊन आत्महत्या विसापूर येथील घटना : पत्नी कामावरून घरी आल्यावर केला आक्रोश

92

आर्थिक विवंचनेतून इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

विसापूर येथील घटना : पत्नी कामावरून घरी आल्यावर केला आक्रोश

सुवर्ण भारत: वैभव मेश्राम
प्रतिनिधी,बल्लारपूर

 

बल्लारपूर : विसापूर येथील घटना त्याने आयटीआय मध्ये जोडारीचे शिक्षण घेतले होते. जोडारीचे काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र नेहमी काम मिळत नसल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली. अशातच त्याला दारुचे व्यसन लागले.कुटूंबाला हातभार लागावा म्हणून पत्नी एका ठिकाणी कामाला जात होती. नेहमी प्रमाणे ती घरी आली. मात्र पतीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यावेळी तिने एकच आक्रोश केला. ही घटना विसापूर येथे सोमवार ( दि. १८ ) मे रोजी रात्री ८.४५ वाजता घडली. मृतक इसमाचे नंदकिशोर ढवस ( ४४ ) रा.साईबाबा वॉर्ड, विसापूर असे नाव आहे.
नंदकिशोर ढवस हा वेल्डिंग चे काम करून कुटुंबाचा गाडा हाकत होता. मात्र वेळेवर त्याला काम मिळत नव्हते. त्यामुळे घरात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत होता. मुलगी व मुलाच्या शिक्षणाची त्याला चिंता सतावत होती. पतीची मिळकत कमी झाली. यामुळे पत्नी ज्योती ढवस एका खासगी आस्थापनेत कामाला जात होती.
घटनेच्या दिवशी मुलगी व मुलगा गावातच राहत असलेल्या आजीआजोबा कडे संध्याकाळी गेली होती. नेहमी प्रमाणे नंदकिशोर ची पत्नी ज्योती रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास घरी आली. घरी आल्यावर तिला पती ओढणीने घरातील पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. तिने एकच हंबरडा फोडला. या घटनेची माहिती विसापूर पोलीस चौकी ला देण्यात आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून त्याचे शव उत्तरीय तपासणी साठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात हलविले. या घटनेचा पुढील तपास विसापूर चौकीचे पोलीस करत आहे.