Home Breaking News • चंद्रपूर प्रभाग सात मध्ये नगरसेवक पदासाठी मीनाक्षी गुजरकर व छबू वैरागडे...

• चंद्रपूर प्रभाग सात मध्ये नगरसेवक पदासाठी मीनाक्षी गुजरकर व छबू वैरागडे यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता!

118

• चंद्रपूर प्रभाग सात मध्ये नगरसेवक पदासाठी मीनाक्षी गुजरकर व छबू वैरागडे यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता!

चंद्रपूर 🔳-विशेष प्रतिनिधी🔳

येत्या 15 जानेवारीला चंद्रपूर महानगरपालिकेची सा

Oplus_16908288a

र्वत्रिक निवडणूक होत आहे.
नगरसेवक पदासाठी जटपूरा प्रभाग सात मधून काँग्रेस पक्षाच्या वतीने मीनाक्षी संजय गुजरकर तर भाजपाच्या वतीने छबू वैरागडे ह्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
🔳सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या मीनाक्षी गुजरकर ह्या काँग्रेस पार्टीच्या वतीने ही निवडणूक लढवित असून त्यांचा प्रचार जोरात सुरू असल्याचे या प्रभागातील काही मतदारांनी एका भेटी दरम्यान सांगितले.तर भाजपच्या छबू वैरागडे ह्या आजपर्यंत आपण या प्रभागात केलेल्या विकास कामांचा पाढा मतदारांना वाचून सांगत असल्याचे दिसून येते.
या प्रभागात काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी गुजरकर व भाजपाच्या उमेदवार छबू वैरागडे यांच्यात चुरशीची व अटीतटीची लढत होण्याची शक्यता असल्याचे राजकीय जाणकारांत बोलल्या जाते.
“घर ते घर “असा प्रचार मीनाक्षी गुजरकर यांनी निवडणूक घोषीत होताच सुरू केला आहे.
प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटीबद्ध राहणार असल्याची ग्वाही देखील त्या मतदारांना देत आहे.