राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त आ.जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात अभिवादन
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस येथील आ.किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस जयंतीनिमित्त माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच आ.किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार भाजप शहर अध्यक्ष संजय तिवारी यांनी म्हटले की,
थोर विचारवंत, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन आणि सर्व युवक-युवतींना राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
भारतीय संस्कृतीचे मोल जगासमोर ठामपणे मांडत त्यांनी तरुणांना स्वाभिमान, कर्तृत्व आणि चारित्र्यनिर्मितीचा मंत्र दिला. आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती आणि मानवतेची सेवा या मूल्यांवर आधारित स्वामी विवेकानंद यांचे विचार आजही भारताला सक्षम व आत्मनिर्भर बनवण्याची दिशा दाखवतात.
तसेच जिजाऊ मातानी
शिक्षक आणि मार्गदर्शक: जिजाऊंनी शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच शौर्य, युद्धकला, राजनीती, भाषा आणि प्रशासनाचे शिक्षण दिले.
स्वराज्याची संकल्पना: त्यांच्या मनात असलेल्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांना घडवले.
प्रेरणास्थान: त्यांनी शिवाजी महाराजांना केवळ माता म्हणून नव्हे, तर एक शिक्षक, मित्र, संरक्षक आणि वडील म्हणून मार्गदर्शन केले, ज्यामुळे त्यांचा चरित्र घडला.
याप्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष संजय तिवारी,महिला शहर अध्यक्षा सौ.सुचिता लुटे, नगरसेवक निरीक्षक तांड्रा, अनिल बाम, संजय भोंगळे, सोनल भरटकर व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.


