#Ghugus
• फिट्टूफाइट्स मार्शल आर्ट्सची लेव्हल वन परीक्षा संपन्न
सुवर्ण भारत: पंकज रामटेके सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
घुग्घूस : फिट्टूफाइट्स कराटे अँड अदर मार्शल आर्ट्स स्कूल, घुग्घूस यांच्या वतीने दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी फिट्टूफाइट्स स्कूल येथे मार्शल आर्ट्सची लेव्हल वन परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली. तीन तास चाललेल्या या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी परीक्षक म्हणून सेंसेई मुहाफिझ सिद्दीकी व सेंसेई नरेश थाटल यांनी काम पाहिले.
या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मिक्स मार्शल आर्ट्स (MMA), वुशू, बॉक्सिंग, किक बॉक्सिंग व जुजुत्सु यांसारख्या जटिल मार्शल आर्ट्स प्रकारांतील आपले ज्ञान व कौशल्य प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे सादर केले. विद्यार्थ्यांची तयारी, तंत्रशुद्धता व आत्मविश्वास पाहून परीक्षकांनी त्यांचे कौतुक केले.
परीक्षेत यशस्वी ठरलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
1. कोविद दीपक तुरानकर
2. रोजन धिरज अवताडे
3. केतन वामन क्षीरसागर
4. पियुष श्रीनिवास कोटा
5. वरुण कुमार वर्मा
6. विष्णु गणगय्या बुटुकुरी
7. धवन अनिल कोट्टे
परीक्षा उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा संघटना अध्यक्ष तथा फिट्टूफाइट्सचे संचालक शिहान विनय बोढे यांनी दिली.



