नाभिक समाज महिलांचा हळदि कु़ंकू व विविध स्पर्धा कार्यक्रम संपन्न.
तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर
भद्रावती : महिला नाभिक समाज तर्फे दिनांक 24 जानेवारीला ला हळदीकुंकू व विविध स्पर्धाचे आयोजन स्थानिक श्री संत नगाजी महाराज नगाजी नगर भद्रावती येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमला उपस्थित प्रमुख पाहुणे सौं सुचिताताई प्रफुल चटकी, न. प. स्वछता व आरोग्य सभापती सौं रेखाताई खुटेमाटे,परीक्षक म्हणून स्नेहा ताई सातपुते, नाभिक महिला करकारिणी अध्यक्ष सौं छायाताई जमदाडे व्यासपीठावर होत्या. नृत्य स्पर्धेमध्ये वयोगट ३ ते ७ प्रथम क्रमांक चेताली घुमे, द्वितीय यशसरी निंबाळकर, तर तिसरा गायू देवईकर यांनी नंबर पटकवला, ७ ते १४ वयोगट नृत्य स्पर्धा मध्ये रावी निंबाळकर, तर दुसरा सांची लांडगे, तिसरा शर्वरी, रिया निंबाळकर यांनी नंबर पटकवला, महिलामध्ये अनेक स्पर्धा मध्ये प्रगती चोधरी शोभा लांडगे, सुरेखा अटकरे, सविता लांडगे यांनी नंबर मिळवले तसेच या कार्यक्रमात न प. स्वछता व आरोग्य सभापती सौं रेखा ताई खुटेमाटे यांचा शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला व हळदीकुंकू वाण, व बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते कारणात आले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वर्षा वाटेकर प्रास्ताविक शालिनी शेंडे, तर आभार सविता लांडगे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोना जांभुळकर, रागिणी सूत्रपवार, भुवनेश्वरी निंबाळकर, मनीषा कडुकरं, भावना हणमंते, पूर्वी नागपूरकर कविता नक्षीने, भाग्यश्री घुमे, अनिता दैवलकर, नंदिनी लांडगे सुप्रिया निंबाळकर, शुभांगी निंबाळकर, शीतल घुमे, वैशाली दळवी, प्रतिभा नक्षीने यांनी सहकार्य केले



