बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या ब्लॉक अध्यक्षपदी हाजी इस्माईल दादाभाई ढाकवाला यांची निवड
सुवर्ण भारत : शंकर महाकाली
बल्लारपूर : हाजी इस्माईल दादाभाई ढाकवा

ला यांची बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या ब्लॉक अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागात नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
हाजी इस्माईल ढाकवाला हे नगरसेवक म्हणून सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असून, शहरातील विविध विकासकामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या संघटन कौशल्याचा व जनसंपर्काचा लाभ पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या निवडीबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी काळात अल्पसंख्यांक समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी व पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ते कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




