Home Breaking News #Ghugus • पहिल्या राष्ट्रीय रोव्हर रेंजर जांबोरी बुधली जि. बालोद (छत्तीसगड)...

#Ghugus • पहिल्या राष्ट्रीय रोव्हर रेंजर जांबोरी बुधली जि. बालोद (छत्तीसगड) येथे प्रियदर्शिनी कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा सहभाग.

40
Oplus_16908288

#Ghugus

पहिल्या राष्ट्रीय रोव्हर रेंजर जांबोरी बुधली जि. बालोद (छत्तीसगड) येथे प्रियदर्शिनी कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा सहभाग.

Oplus_16908288

सुवर्ण भारत:पंकज रामटेके  सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर 

घुग्घुस  : २७ जानेवारी २०२६. भारत स्काऊट आणि गाईड अंतर्गत पहिली राष्ट्रीय रोव्हर रेंजर जांबोरीचे आयोजन बुधली जि. बालोद छत्तीसगड येथे दिनांक ०९ जानेवारी २०२६ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत करण्यात आले होते.

या पहिल्या राष्ट्रीय रोव्हर रेंजर जांबोरीत श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली अंतर्गत स्थानिक प्रियदर्शिनी कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, घुग्घूस ता. जि. चंद्रपूर येथील रेंजर केप्टन डॉ. वैशाली जोशी यांचे सह विदयालयातील ७ रेंजर्सनी जिल्हयाचे नेतृत्व केले. या जांबोरीत झालेल्या विविध स्पर्धामध्ये प्रियदर्शिनी कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या रेंजर्सनी नेत्रदिपक यश संपादन करुन जिल्हयामध्ये मानाचा तुरा रोवला आहे.

सदर कार्यासाठी सहभागी रेंजर कॅप्टन व रेंजर्स यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.