• व्हॅलेंटाईन डे – बाजारपेठत गर्दी!
• फूल बाजारात गुलाबाच्या फूलाला अधिक मागणी
सुवर्ण भारत:किरण घाटे
कालपासून येथील बाजारपेठेत चांगलीच गर्दी दिसू लागली आहे.
प्रेम दिनानिमित्त आज स्थानिक फूल बाजारात गुलाबाच्या फूलाला तरुण तरुणींकडून अधिक मागणी होत असल्याचे बाजारपेठेचा फेरफटका मारला असता दिसून आले.
एरव्ही दहा ते पंधरा रुपयात मिळणा-या गुलाबाच्या फूलाची किंमत आज २५ते ३०रुपयांपर्यतच्या घरात पोहचली होती.
विशेषता गुलाबाच्या फूलाला मोठ्या प्रमाणात आज सकाळपासून मागणी होत असल्याचे एका फूल विक्रेत्यांने सांगितले.
काही दुकाणात फूलांसोबतच शहरातील भेट वस्तू दुकानात टेडीबिअरची मागणी होत असल्याचे दिसून आले. विविध भेट वस्तू खरेदी साठी युवक युवतींची गर्दी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे चित्र दिसत होते.





