Home Breaking News #Chandrapur • जागतिक महिला दिन- चंद्रपूरात विविध कार्यक्रम संपन्न!

#Chandrapur • जागतिक महिला दिन- चंद्रपूरात विविध कार्यक्रम संपन्न!

153
Oplus_131072

#Chandrapur

• जागतिक महिला दिन- चंद्रपूरात विविध कार्यक्रम संपन्न!

सुवर्ण भारत:किरण घाटे(विदर्भ विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर : तुकूमस्थित राणी राजकुवर शाळा जवळील प्रांगणात रविवार दि.८मार्चला जागतिक महिला दिन उत्साहात व थाटात पार पडला .
या कार्यक्रमाचे आयोजन चंदा बाबाराव जिवतोडे ,चंदा प्रदीपराव इटनकर,अर्चना ठाकरे व मीना नरेंद्र वैद्य यांनी केले होते.सदरहु
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष कसामगोट्टूवार,राहुल विरुटकर,श्रुती घाटे,सरला कुळसंगे
डॉ.आसावरी देवतळे ,डॉ.उज्वला चव्हाण ,जयदीप रोडे, अमर सिंग राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.

अपंग महिला व निराधार महिलांना साडी चोळी देऊन या वेळी सन्मानित करण्यात आले या शिवाय डान्स ,संगीत खुर्ची,प्रश्न मंजुषा आदिं कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुक्रमे चैताली नवले व चंदा जिवतोडे यांनी केले. उपरोक्त कार्यक्रमाला मंजुश्री कासमगोट्टूवार,सिरीज पतरंगे ,बाबाराव जिवतोडे, संजु चांदेकर व या प्रभागातील महिला व
पुरुष मोठ्या संख्येंने उपस्थित होते.