• सामाजिक क्षेत्रात चंद्रपूरच्या प्रियंका चिताडे यांचे कार्य अमुल्य व उल्लेखनीय!
सुवर्ण भारत:किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : महाविद्यालयीन जीवनापासूनच समाजसेवेची अमाप आवड व गोडी असणा-या प्रियंका चिताडे यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य अतिशय अमुल्य व उल्लेखनीय असेच आहेत.
त्या मुळच्या चंद्रपूर शहरातील सार्वजनिक हनुमान मंदिर नगिना बाग येथील!
प्रियंका संजय चिताडे यांचे शिक्षण बिएस्सी पर्यंत!
स्वभाव अतिशय शांत व प्रेमळ! कुठलेही हाती घेतलेले काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड सुरू असते.
आपल्या प्रभागातील समस्या व मुलभूत गरजेसाठी सदासर्वदा त्यांनी आपला आवाज बुलंद केला आहे.
अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे.
विशेष उल्लेखनीय बाब अशी कि समाजसेविका प्रियंका चिताडे यांनी रुग्णांना वेळोवेळी सेवा देत काही गरजू रुग्णांना त्यांनी उपचारार्थ उपराजधानी नागपूरात हलविले आहे.
त्यामुळे त्या आज आपल्या प्रभागात लोकप्रिय ठरल्या आहेत.सामाजिक बांधिलकी जपणा-या याच प्रियंकाने वृध्दाश्रमांना भेटी देत समाजातील विविध गरजू लोकांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे.
राजकारणापेक्षा आपणांस समाजसेवा करणे अधिक आवडते अश्या त्या या प्रतिनिधीशी बोलताना आज म्हणाल्या.





