Home Breaking News २० तासानतंर वर्धा नदीत बुडालेल्या तिघांच्या मृतदेह सापडला

२० तासानतंर वर्धा नदीत बुडालेल्या तिघांच्या मृतदेह सापडला

13

२० तासानतंर वर्धा नदीत बुडालेल्या तिघांच्या मृतदेह सापडला

घुग्घूस येथून जवळ असलेल्या वर्धा नदीच्या धानोरा काठावर तीन जण बुडाल्याची घटना दिनांक 28 एप्रिल ला सकाळी 10.30 वाजता दरम्यान घडली होती.त्या तिघांचा शोध पोलीस बोटीच्या सह्याने घेत असताना रात्र झाल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली होती.
दिनांक 29 एप्रिल ला पोलिसांनी सकाळी 6 वाजता शोध मोहीम राबविली असता पाण्यात बुडालेल्या तिघांचेही मृतदेह आढळून आले. मृतकाचे नाव राजू हरिश्चन्द्र कोडापे वय (40 )वर्ष, त्याची मुलगी अर्पिता राजू कोडापे वय (12)वर्ष दोन्ही रा. खामोना ता. राजुरा व राजू कोडापे यांची भाची प्रियंका शामराव मडावी वय (14)वर्ष रा. धानोरा ता. चंद्रपूर अशी आहे.

राजुरा तालुक्यातील खामोना या गावातील रहिवाशी राजू हरिश्चन्द्र कोडापे वय (40)वर्ष व त्याची मुलगी कु.अर्पिता राजू कोडापे वय (12) वर्ष हा धानोरा येथे बहिणीच्या घरी आला होता. दिनांक 28 एप्रिल ला सकाळी 10.30 वाजता दरम्यान वर्धा नदीच्या काठावर राजू, मुलगी अर्पिता व त्याची भाची प्रियंका हे तिघे जण कपडे धुण्यासाठी गेले.दोन्ही मुली कपडे धूत असताना राजू कोडापे हा स्नान करण्यासाठी पाण्यात उतरला त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला व गटांगळ्या खाऊ लागला त्याने स्वतःला वाचविण्याचा प्रयन्त केला पण त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यावेळी त्याची मुलगी अर्पिता कोडापे व भाची प्रियंका मडावी यांनी नदीत उडी मारून राजू याला वाचविण्याचा प्रयन्त केला परंतु त्या दोघीनाही पोहता येत नसल्याने तिघेही खोल पाण्यात बुडाले.

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.व यासंदर्भात घुग्घूस पोलिसांना माहिती देण्यात आली असता पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले व बोटीच्या सह्याने सायंकाळपर्यत शोध मोहीम राबविण्यात आली होती परंतु कोणताही थांगपंता लागला नाही यानंतर रात्र झाल्यामुळे शोध मोहीम थांबवून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता शोध मोहीम सुरु केली असता तिघांचेही मृतदेह नदीच्या पाण्यात आढळून आले.
पोलिसांनी पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आहे. मात्र गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहे.