Home Breaking News अवैध व्यवसायावर प्रतिबंध लावुन कारवाई करा….पुजा दुर्गम

अवैध व्यवसायावर प्रतिबंध लावुन कारवाई करा….पुजा दुर्गम

10

अवैध व्यवसायावर प्रतिबंध लावुन कारवाई करा….पुजा दुर्गम

घुग्घुस :  शहरात दिवसेंदिवस अवैध व्यवसाय खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे, अवैध व्यवसायात मटका, जुगार, गांजा व दारूच्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत असुन शासन, प्रशासन दुर्लक्ष करीत आहे,असे वाटत आहे.

घुग्घुस शहरामध्ये अनेक वर्षांपासून मटका, जुगार, गांजा व अवैध दारू यांचे खुलेआम अवैध व्यवसाय सुरु आहेत. या गैरप्रकारांमुळे शहरातील अनेक अल्पवयीन मुलांचे भविष्य धोक्यात येत आहे तसेच अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत.

सदर बाब अतिशय गंभीर असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे या अवैध धंद्यांवर तात्काळ प्रतिबंध घालून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, ही विनंती.

घुग्घुस शहर भाजप महिला आघाडीच्या वतीने आपणास नम्र विनंती शासन,प्रशासनाला करण्यात येत आहे, या प्रकरणी लवकरात लवकर ठोस पावले उचलण्यात यावीत. अन्यथा शिवराय पद्धतीने आंदोलन करण्यास बाध्य व्हावे लागेल.

याप्रसंगी माजी ग्रा.पं.सदस्य तसेच भाजप नेत्या पुजा दुर्गम,भाजप महिला अध्यक्षा सौ.सुचिता लुटे, सामाजिक जेष्ठ महिला कार्यकर्त्या सौ.पुष्पाताई रामटेके,सुनिता गिवे, सुनिता पाटील,जेष्ठ नेते गणेश शेंडे व पदाधिकारी आदी उपस्थित होते.