हडस्तीत निराधार व श्रावणबाळ लाभार्थ्यांसाठी शिबिर संपन्न
सुवर्ण भारत : वैभव मेश्राम (प्रतिनिधी,बल्लारपूर)
विसापूर:-हडस्ती (ता. बल्लारपूर) येथे निराधार व श्रावण बाल लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र व उत्पन्न दाखला काढण्यासाठी शिबिर यशस्वीरित्या पार पडला. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार व भाजपाचे पिंटु देऊळकर बल्लारपूर ग्रामीण तालुका अध्यक्ष यांच्या मार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिर हनुमान मंदिर, हडस्ती येथे पार पडला असून, ज्येष्ठ नागरिकांनी हयात प्रमाणपत्रासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. उत्पन्न दाखला प्रक्रियेसाठी तलाठी दीपक निंमबाळकर उपस्थित होते. तसेच, सेतू सेवा केंद्राच्या प्रतिनिधींनी देखील उपस्थित राहून लाभार्थ्यांना आवश्यक सहकार्य केले.
तरी या शिबिरामुळे गावातील अनेक लाभार्थ्यांना दिलासा मिळाला असून, आयोजकांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.


