Home Breaking News घुग्घुस येथील पंचशील चौकात भव्य भोजनदानाचे आयोजन

घुग्घुस येथील पंचशील चौकात भव्य भोजनदानाचे आयोजन

13

घुग्घुस येथील पंचशील चौकात भव्य भोजनदानाचे आयोजन

घुग्घुस येथील १ मे २०२६ शुक्रवार रोजी बुद्ध पौर्णिमा निमित्त सकाळी अनेकानेक प्रभागातील बुद्ध विहारामध्ये सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध तसेच महामानव प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस द्विपजवलीत करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, व सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आले.

वरिष्ठ अनुयायांनी म्हणटले की,तथागत बुद्धांनी जगाला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला. त्यांनी ‘पंचशील’ तत्त्वांचा उपदेश केला, ज्यात अहिंसा, अस्तेय (चोरी न करणे), सत्य, ब्रह्मचर्य आणि मादक पदार्थांपासून दूर राहणे यांचा समावेश आहे. “जगा आणि जगू द्या” हा त्यांचा मूळ मंत्र होता.

तसेच खीर वाटप करण्यात आले.

सांयकाळी शहरातील बसस्थानक परिसरात आइस्क्रीम वाटप आले.

जय भीम युवा मंच व भारतीय बौद्ध शहासभाच्या वतीने पंचशील चौकात भव्य भोजन दानाच्या मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला.

हजारोच्या संख्येने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात शांतिपूर्वक भोजनदानच्या आस्वाद घेण्यात आले.