Home Breaking News महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मनसे वाहतूक सेनेतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हाध्यक्ष महेश...

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मनसे वाहतूक सेनेतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हाध्यक्ष महेश वासलवार यांचा जनहितार्थ उपक्रम; राज्य उपाध्यक्ष सुधीर खापणे यांच्या हस्ते सोहळा पार

17

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मनसे वाहतूक सेनेतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण

जिल्हाध्यक्ष महेश वासलवार यांचा जनहितार्थ उपक्रम; राज्य उपाध्यक्ष सुधीर खापणे यांच्या हस्ते सोहळा पार

सुवर्ण भारत: शंकर महाकाली

चंद्रपूर : महाराष्ट्र दिनानिमित्त जनहिताचे उपक्रम राबविण्याची परंपरा जपत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेतर्फे यंदाही एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला. जिल्ह्यातील गरजू नागरिकांना तातडीची आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश वासलवार यांच्या पुढाकारातून रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

या रुग्णवाहिकेचे उद्घाटन वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष सुधीर खापणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष राजू कुकडे, जनहित कक्ष विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, उमाशंकर तिवारी, सुनील गुढे, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, पियुष धुपे, कल्पना पोतर्लावार, वर्षा बोमले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

स्थानिक श्रीराम वॉर्ड येथील मनसे जनहित कक्ष कार्यालयात हा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी रुग्णवाहिकेची विधिवत पूजा करून नारळ फोडत ती जनतेच्या सेवेसाठी समर्पित करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “रुग्णसेवा हीच खरी सर्वोच्च सेवा आहे. अपघात अथवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर उपचार मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. ही रुग्णवाहिका गरजूंसाठी जीवनदायी ठरेल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.