Home Breaking News ब्रम्हपुरीत अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जनजागृती कार्यक्रम

ब्रम्हपुरीत अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जनजागृती कार्यक्रम

98

ब्रम्हपुरीत अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जनजागृती कार्यक्रम

सुवर्ण भारत: रवि चामलवार (ब्रम्हपुरी, प्रतिनिधी)

ब्रम्हपुरी (दि. ५ मे २०२६) : पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांच्या कार्यालयीन आदेशानुसार पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे मंगळवारी सायंकाळी ४.४० ते ६.१५ या वेळेत अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात संत गाडगेबाबा विचार प्रबोधन बहुउद्देशीय संस्था, अमरावतीचे संस्थापक अध्यक्ष श्रीकृष्ण शा. धोटे व पी. एम. जाधव यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस पाटील यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी जादूटोणा विरोधी कायद्याचे महत्त्व, अंधश्रद्धेमुळे समाजात निर्माण होणारे धोके तसेच कायदा व सुव्यवस्थेवर होणारे परिणाम याबाबत माहिती देण्यात आली. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन उद्भवणाऱ्या समस्यांना कशा प्रकारे आळा घालता येईल, यावरही मार्गदर्शन करण्यात आले.

दरम्यान, पोलीस पाटील यांची मासिक बैठकही पार पडली. बैठकीत गावांमध्ये आढळणाऱ्या अवैध प्रकारांबाबत तसेच स्थानिक समस्यांवर चर्चा करून त्यावर उपाययोजनांबाबत सूचना देण्यात आल्या.

कार्यक्रमास पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथील अधिकारी, कर्मचारी व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.