Home Breaking News नोकरीचे आमिष दाखवून लाखाची फसवणूक; रक्कम न्यायालयाच्या आदेशाने परत

नोकरीचे आमिष दाखवून लाखाची फसवणूक; रक्कम न्यायालयाच्या आदेशाने परत

96

नोकरीचे आमिष दाखवून लाखाची फसवणूक; रक्कम न्यायालयाच्या आदेशाने परत

सुवर्ण भारत : रवि  चामलवार 
प्रतिनिधी, ब्रम्हपुरी

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी) – मुलीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 1 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित रक्कम फिर्यादीस परत करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन हद्दीत अपराध क्रमांक 161/2025 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4) व 3(5) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. फिर्यादी यशवंत नागो शेंडे (रा. अड्याळ जाणी) यांना त्यांच्या मुलीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आरोपी मनोज दादाजी नरसाळे (वय 33, रा. नवेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक) व त्याच्या सहकाऱ्यांनी 1,00,000 रुपये उकळले होते.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून 1 लाख रुपये जप्त केले. पुढे माननीय न्यायालयाने ही रक्कम फिर्यादीस परत करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार, आज जप्त केलेली 1,00,000 रुपयांची रक्कम फिर्यादी यांना अधिकृतपणे परत करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक, ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन यांनी दिली आहे.