कोरपणा तालुक्यात अवैध खर्रा विक्रीबाबत नागरिकांमध्ये संताप; प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी
सुवर्ण भारत : मोबिन बेग
कोरपना प्रतिनिधि
कोरपणा : कोरपणा तालुक्यात काही ठिकाणी अवैधरित्या खर्रा विक्री होत असल्याची तक्रार नागरिकांकडून सातत्याने पुढे येत आहे. संबंधित प्रकारामुळे युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून, या प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची भावना काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, अवैध खर्रा विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित तपासण्या, छापे आणि दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही दयामाया न दाखवता कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सुज्ञ नागरिकांनी जिल्हा प्रशासन, अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस विभागाने संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून अवैध खर्रा विक्रीला आळा घालावा, अशी मागणी केली आहे. तसेच युवकांचे आरोग्य आणि समाजहित लक्षात घेऊन या गंभीर प्रश्नावर तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.








